प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत स्टेट बँकेकडून दोन लाखांचा धनादेश प्रदान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत स्टेट बँकेकडून दोन लाखांचा धनादेश प्रदान

अहमदनगर :  श्रीमती मदिना शमशोद्दीन तांबोळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 47व्या वर्षी अकस्मात निधन झाले. श्रीमती तांबोळी या शिक्षक म्हणून

कोरोना काळात अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही – पै.अक्षय कर्डिले
कर्डिले-तनपुरे…आता पुरावे द्यायला पुढे या..
माळीवाडा परिसरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु

अहमदनगर : 

श्रीमती मदिना शमशोद्दीन तांबोळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 47व्या वर्षी अकस्मात निधन झाले. श्रीमती तांबोळी या शिक्षक म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील गावी कार्यरत होत्या. 

त्यांच्या पगाराचे खाते स्टेट बँक इंडियाच्या बुरुडगाव रस्ता शाखेत होते. त्यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत 330 रुपयांचा वार्षिक हप्ता विमा उतरवलेला होता. 

याअंतर्गत त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे वारस पती हमीद अली तांबोळी यांना त्वरित दोन लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेश भारतीय स्टेट बँकेकडून देण्यात आला.

यावेळी झालेल्या छोट्याश्या कार्यक्रमात बँकेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र मिसाळ यांच्यासह सेवा व्यवस्थापक सुशांत पदानिकर, श्रीमती सोनाली येवले, अक्षय मोहिते, उमेश घुबे, उमेश हुरडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शाखा व्यवस्थापक रवींद्र मिसाळ यांनी सांगितलेे, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना ही स्तुत्य योजना असून यामध्ये सर्व ग्राहकांनी आपापला विमा उतरवून घ्यावा. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या पीएमएसबीवाय, पीएमजेबीवाय व अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ऐनवेळी मिळालेल्या या मदतीबद्दल हमीद तांबोळी यांनी ऋण व्यक्त केले.

COMMENTS