पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नान्नोर यांच्या दोन्ही मुलांना ओलिस ठेवून  वैशाली यांचा घातपात करण्याच्या हेतुनेच निलं

पेट्रोल -डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू
स्कॅनचे दर कमी केल्याने गरजूंना मिळणार दिलासा-डडीयाल
पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेला l पहा LokNews24

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नान्नोर यांच्या दोन्ही मुलांना ओलिस ठेवून  वैशाली यांचा घातपात करण्याच्या हेतुनेच निलंबित पोलीस साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे याने प्रयत्न केला आहे.त्याने पोलीसांवर चालवलेल्या दोन गोळ्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.थोडीही चुक  झाली असती तर पोलीसाच्या जीवावर बेतली असती.पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके व पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी चांगली कामगिरी केली आहे.निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे हा सेवेत असल्या पासुनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यास एका गुन्ह्यात पाच वर्षाची शिक्षा लागलेली आहे.असे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी  सांगितले.

               डिग्रस येथिल वैशाली नान्नोर यांच्या दोन्ही मुलांना ओलिस ठेवून वैशालीचा घातपात करण्याचा उद्देश असलेल्या निलंबित पोलीस साहाय्यक निरीक्षक सुनिल लोखंडे याने पोलीसांवर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळी पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी भेट दिल्या नंतर कृषी विद्यापीठातील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पञकार परिषेदेत बोलताना शेखर यांनी माहिती दिली.

           पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी पञकारांशी बोलताना सांगितले की,  निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे  हा पोलीस खात्यात असल्या पासुन गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. लोखंडे यांच्यावर 2007 मध्ये शिरुर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.तर 2010 मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असुन या गुन्ह्यात त्यास पाच वर्षाची शिक्षा लागलेली आहे.

           संबंधित महिलेची सोशल मिडीयावर बदनामी केली असल्याचा गुन्हा दाखल असुन या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी राहुरीच्या पोलीसांनी त्याचे लोकेशन घेवून पुणे व मिळालेल्या लोकेशनवर त्याचा शोध घेतला असता तो पोलीसांना गुंगारा देत होता.तोच गुन्हा मागे घेण्यासाठी वैशाली नान्नोर यांच्या दोन्ही मुलांना ओलिस ठेवले होते.प्रसंगवधान राखत पोलीसांनी दोन्ही मुलांची सुखरुप सुटका केली.परंतू पोलीसांवर त्याने गोळीबार केला. पोलीस व आरोपीच्या झटापटीत थोडीही चुक झाली असती तर पोलीसांच्या जीवावर बेतली असती. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके व पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे त्यांच्या बरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखुन मोठी कामगिरी केली आहे.

                 पोलीस महानिरीक्षक शेखर घटनेची माहिती देताना सांगितले की, आरोपी हा पहाटे बंगल्याच्या पाठीमागे येवून थांबला नान्नोर यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडताच भिंतीवरुन उडी मारुन बंगल्यात प्रवेश केला दारात असलेल्या दोन्ही मुलांच्या डोक्यास पिस्तुल लावून ओलिस ठेवले. वैशाली नान्नोर यांनी  पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करुन घटनेची माहिती दिल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे.पोलीसांनी प्रसंवधान राखत आरोपी जवळील पिस्तुल ताब्यात घेण्यासाठी झडप घातली परंतू थोडी हि चुक पोलीसांच्या जीवावर बेतली असती.

              आरोपी जवळ सापडलेले तीन पिस्तुल हे मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश भागात बनविले जाते.आरोपीने हे पिस्तुल कोणाकडून घेतले आहे याचा शोध घेतला जाणार आहे. पोलीस हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.पोलीस खात्यात असताना ही त्यांचे चाल चलन गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्याच्यावर दोन गुन्हे दाखल असुन एका गुन्ह्यात पाच वर्षाची शिक्षा लागलेली आहे.गुन्हेगारीतुन मोठी माया कमविली आहे.

           आरोपी हा पोलीस खात्यातील निलंबित पोलीस निरीक्षक लोखंडे हा शस्ञ हातळण्याची सवय असल्याने त्याने पोलीसांच्या दिशेने केलेला गोळीबार पोलीसांनी प्रसंगवधान राखुन चुकविला नसता तर आजचे चिञ वेगळे दिसले असते.या आरोपीवर खुनाचा प्रयत्न,अपहरण,डांबुन ठेवणे,शस्ञ बाळगणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शेखर यांनी सांगितले.

COMMENTS