पोटनिवडणूक पुढे ढकला; निवडणूक आयोगाला सरकारचे पुन्हा पत्र

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

पोटनिवडणूक पुढे ढकला; निवडणूक आयोगाला सरकारचे पुन्हा पत्र

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पुढील काही दिवसांत होणार आहे. त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. म

मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…
शरद पवारांच्या उपस्थितीत डीपीआयचे कार्यकर्ता महाअधिवेशन!
हल्ल्यानंतर गडचिरोलीत ’हाय अलर्ट’

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पुढील काही दिवसांत होणार आहे. त्यासंदर्भातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मात्र राज्यातील पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पुन्हा केली.
राज्यात 19 जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती. मात्र, निवडणूक घेण्यावर आयोग ठाम राहिले. त्यावर, राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य शासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले होते. पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी लेखी विनंती राज्य शासनाने पुन्हा केली आहे.

COMMENTS