पैसे घेतले का विचारले म्हणून पत्नीसह जन्मदात्यांना मारहाण…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैसे घेतले का विचारले म्हणून पत्नीसह जन्मदात्यांना मारहाण…

अहमदनगर/प्रतिनिधी - पाकिटातून पाचशे रुपये घेतल्याचा संशय घेतल्याने त्या रागातून आई-वडिलांना व पत्नीला पतीकडून बेदम मारहाण करण्याची घटना नगरमध्ये नाले

कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासून करावे
श्रीगोंद्यात शिवसेनेची महिला शाखा कार्यकारिणी जाहीर
कोपरगावकर गढूळ पाण्याने त्रस्त ः मंगेश पाटील

अहमदनगर/प्रतिनिधी – पाकिटातून पाचशे रुपये घेतल्याचा संशय घेतल्याने त्या रागातून आई-वडिलांना व पत्नीला पतीकडून बेदम मारहाण करण्याची घटना नगरमध्ये नालेगाव येथील टांगे गल्लीत घडली.
याबाबतची माहिती अशी की श्रीजा मिलींद म्याना (वय 27, रा.टांगे गल्ली, नालेगाव) यांचे पती मिलिंद म्याना याला दारुपिण्याचे व्यसन असून तो काहीएक कामधंदा करत नाही. तसेच दारु पिऊन काही एक कारण नसताना आई-वडील व पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करायचा. तसेच हातात चाकू घेवून मी तुमचा खून करीन, अशी धमकी द्यायचा. यापूर्वी त्याच्याविरुध्द पोलीस ठाण्यात एन.सी. दाखल केलेली आहे. शनिवारी (दि.23) मिलिंद याने पत्नीस शंभर रुपये मागितले. तिने त्याला खाली स्वयंपाक घरातील पाकिटातून घ्या, असे सांगितले. त्यानंतर श्रीजा म्याना यांनी पैशाचे पाकिट पाहिले असता त्यामध्ये शंभर रुपयेव्यतिरीक्त असलेली पाचशे रुपयाची नोट नव्हती. त्यामुळे त्यांनी पतीस तुम्ही किती पैसे घेतले, असे विचारले असता तेव्हा पतीने मी शंभर रुपये घेतले, असे सांगितले. त्यांना पाकिटामध्ये 500 रुपये नसल्याचे सांगितल्यावर त्याचा राग येऊन मिलिंद याने त्याच्या आईला, तू पाकिटातले 500 रुपये घेतले का, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर वडील शंकरराव यांना फोनवर शिवीगाळ करून घरी बोलवून घेतले व त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी श्रीजा या सोडवण्यासाठी मध्ये गेल्या असता मिलिंद याने स्वयंपाक घरातला स्टीलचा ताब्या उचलून पत्नीच्या डोक्यात मारल्याने कोच पडून दुखापत झाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून गुन्हयाचा तपास पोलिस हवालदार बोरुडे करीत आहे. पाकिटातून पाचशे रुपये घेतले का अशी विचारणा केल्याचा राग येऊन आई-वडिलाना शिवीगाळ करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्नीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारुन जखमी करण्याची ही घटना शहरात चर्चेत आहे.

COMMENTS