नवी दिल्ली : पेगॅसीस कथित हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी न
नवी दिल्ली : पेगॅसीस कथित हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती आर व्ही रविंद्र यांच्या नेत्रृत्वाखाली तीन सदस्यीय समितीच स्थापना केली आहे.
कथित हेरगिरी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात एक्सपर्ट कमिटीची स्थापना करुन त्यामार्फत चौकशी व्हायला हवी. न्यायालयाने या प्रकऱणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती तयार केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आरव्ही रवींद्रन करणार आहेत. तर समितीतील इतर सदस्यांमध्ये आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 आठवड्यांनी होणार आहे. काही महिन्यापूर्वी पेगासस हेरगिरी प्रकरणाचा मुद्दा समोर आला होता. आंतरराष्ट्रीय मीडिया एजन्सींनी दावा केला होता की भारत सरकारने इस्रायली स्पायवेअरच्या आधारे देशातील अनेक राजकारणी, पत्रकार आणि देशातील इतर सेलिब्रिटींची हेरगिरी केली होती. मात्र, केंद्र सरकारने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.
COMMENTS