पुण्यात सोमवारपासून मॉल्स सुरू होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सोमवारपासून मॉल्स सुरू होणार

राज्यातील टाळेबंदी लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवर निर्णय घेतले जात आहेत.

तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला
लातुरातील विभागीय क्रीडा संकुल, 400 मीटरचा सिंथेटिक धावनपथ, स्क्वॅशकोर्टही अधांतरी
१७ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा.                

पुणे / प्रतिनिधी: राज्यातील टाळेबंदी लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवर निर्णय घेतले जात आहेत. पुणे शहराच्या बाबतीतही असाच दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज काउन्सिल हॉल येथे झालेल्या बैठकीत शहरासह जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काही निर्णयांची घोषणा केली. त्यानुसार, पुणे शहरातील दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, येथील मॉलदेखील सुरू होणार आहेत. अभ्यासिका, वाचनालये सुरू करण्यास  परवानगी देण्यात आली आहे. उद्याने आणि मोकळी मैदाने दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू केली जाणार आहेत. सोमवारपासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृहे मात्र तूर्त बंदच राहणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंधांमध्ये सध्या कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या संसर्गाच्या सध्याच्या स्थितीत बदल झाल्यास त्यानुसार निर्बंध कमी-जास्त केले जातील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS