Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

स्कूल बस चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : बदलापूर येथील दोन चिमुरड्यावर अत्याचाराची घटना ताजी असतांना पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर स्कूल बस ड्रायव्हरने अत्याचार केल्याची घटना समोर

पंढरपूर शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा
आ.ससाने कडून ग्रामीण भागातील रस्त्याची पाहणी
10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार

पुणे : बदलापूर येथील दोन चिमुरड्यावर अत्याचाराची घटना ताजी असतांना पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर स्कूल बस ड्रायव्हरने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळतांना दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी संजय जेटींग रेड्डी (वय- 45, रा. वैदुवाडी, हडपसर,पुणे) याला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने हडपसर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कूल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्‍लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कूनबसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कूल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कूलबसमधे होती का हा प्रश्‍न उपस्थित होतो. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली स्कूलबस
पुण्यात स्कूल बसच्या चालकाने दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्कूल बसची तोडफोड केली. याच बसमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

फडणवीसांचे कठोर कारवाईचे निर्देश
या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच संस्थाचालकांना स्कूलबस चालक व वाहकांची पार्श्‍वभूमी तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही दिली आहे.फडणवीस म्हणाले की, पुण्यात स्कूल बसमध्ये एका चालकाने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याने आणखी एका मुलीवरही अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. अतिशय वाईट पद्धतीने हे शोषण झाले आहे. चालक फरार होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर कठोर कलमे लावली आहेत. आरोपीवर पोलिसांकडून निश्‍चितपणे कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS