पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक : अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक : अजित पवार

मुंबई :- पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोप

एमपीएससीच्या रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार : अजित पवार
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न : अजित पवार
जरंडेश्वरचे भूत कुणाच्या मानगुटीवर बसणार ?

मुंबई :- पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

COMMENTS