पीएम केअर फंडातील व्हेंटीलेटर निघाले खराब

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

पीएम केअर फंडातील व्हेंटीलेटर निघाले खराब

कोरोनाला हरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अशात पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले असल्याचा आरोप ससून हॉस्पिटलचे अधीष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी केला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
कोर्टाच्या सुरक्षेसाठी चौक्या उभाराव्यात; वाढत्या गोळीबारावरून सर्वोच्च न्यायालय चिंतेत
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांबरोबर

पुणे/प्रतिनिधीः कोरोनाला हरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अशात पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले असल्याचा आरोप ससून हॉस्पिटलचे अधीष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील तक्रार उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.  

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटीलेटर ठीक चालत नाहीत. अनेकदा बंद पडतात, अशी तक्रार तांबे यांनी आढावा बैठकीत केली आहे. याशिवाय कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्राकडून मिळालेले व्हेंटीलेटरही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोरोना काळात करण्यात आलेल्या मदतीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यातच तांबे यांच्या आरोपामुळे व्हेंटीलेटरच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अधिकअधिक लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. असे असताना केंद्राकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय कोरोना काळात योग्य वैद्यकीय मदत किंवा उपकरणे मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राज्यात काही दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेत नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, केंद्राकडून महाराष्ट्रासाठी येत्या तीन-चार दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जावडेकर म्हणाले, की कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. पुणेकरांनी टाळेबंदीला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुणेकरांचे कौतुक केले पाहिजे. राज्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारमधील संबंधित विभागाशी चर्चा करून राज्यासाठी व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यांपैकी गुजरातमधून सातशे आणि आंध्र प्रदेशमधून 421 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत.

COMMENTS