पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चपराळा अभयारण्यासह भामरागडमधील दोदराज येथे भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चपराळा अभयारण्यासह भामरागडमधील दोदराज येथे भेट

गडचिरोली : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात जंगली हत्तींना संरक्षित जंगल म

तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली l LOKNews24
देशात 9 हजार 355 नवे कोरोना रूग्ण
नाशिक शिक्षक मतदार संघ 93.48 टक्के ; कोपरगाव तालुक्यात 93.58 टक्के मतदान
गडचिरोली : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात जंगली हत्तींना संरक्षित जंगल मिळवून देण्यासाठी चपराळा येथील अभयारण्याची पाहणी वन विभागातील अधिकाऱ्यांसह केली. गडचिरोली जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का याबाबत पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे पालकमंत्री शिंदे यांना हत्तींबाबत, त्याच्या नैसर्गिक निवासाबाबत व जागा तयार करावयाची असल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत सादरीकरण उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांनी केले. मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी यावेळी हत्तींबाबतची सद्यस्थिती सांगितली. भेटीत जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी भामरागड येथील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथील जवानांना दिपावली पुर्व शुभेच्छा दिल्या. नक्षली कारवायांना रोखण्यासाठी घरापासून दूर सणवार सोडून सेवा बजावणाऱ्या जवानांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व दिवाळीचा फराळही केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.

COMMENTS