पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका ; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका ; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : कोल्हे

उन्हाळी रोटेशन १५ मार्च, १५ एप्रिल, १५ मे अशा तारखा उन्हाळी आवर्तन जाहिर होणे गरजेचे असतांना देखील तसे झाले नाही त्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे.

संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
सुप्रिया सुळेंनी देखील त्यांचा ’वायनाड’ मतदारसंघ शोधावा : माजी मंत्री राम शिंदे

कोपरगाव शहर प्रतिनिधी – उन्हाळी रोटेशन १५ मार्च, १५ एप्रिल, १५ मे अशा तारखा उन्हाळी आवर्तन जाहिर होणे गरजेचे असतांना देखील तसे झाले नाही त्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असुन देखील पाटबंधारे विभागाने कुठलेही प्रकारचे आवर्तन जाहिर न केल्याने शेतकरी बांधवांवर मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, उन्हाळी रोटेशनच्या तारखा कधी जाहिर होणार ? असा प्रश्न उपस्थितीत करुन पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव , माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी दिला आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाला धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने शेतकरी बांधवांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. शेतकरी बांधवांचा हेतू हा होता की, पाटबंधारे खात्याकडून उन्हाळ्यात तीन आवर्तन मिळतीलच अशी आपेक्षा शेतकरी बांधवांना होती. एप्रिल महिना सुरु होवुन देखील आवर्तनाची तारखा पाटबंधारे विभागाने जाहिर केलेले नाही, विहीरींची पाण्याची पातळी देखील खुपच कमी झाल्याने तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पिकांची देखील मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. धरणात पाणीसाठा मुबलक असतांना देखील पाटबंधारे विभागाने आवर्तन बाबतचे नियोजन करणे गरजेचे असतांना देखील पाटबंधारे विभागाने तसे न केल्याने पाणीवाटप बाबत पाटबंधारें विभागाचे धोरण नेमके आहे तरी काय ? हे तरी शेतकरी बांधवांना सांगितले पाहिजे. मागील वर्षी उन्हाळी आवर्तन व पाऊस एकाच वेळेस सुरु झाला होता. परंतू मागील वर्षी उन्हाळी पीके कमी असल्याने पाणी मागणी कमी होती. यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. पाणी मागणी वाढलेली आहे. धरणातही पाणीसाठा पुरेशा प्रमाणात आहे. मग यापूर्वीच मार्चमध्येच उन्हाळी पहिले आवर्तन मिळालेच पाहिजे होते परंतू याबाबत देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता एप्रिल ला आवर्तन सुरू होईल तोपर्यंत शेतक -यांची पीके हाता बाहेर गेलेली दिसतील मग धरणातील पाण्याचे काय करणार का  त्यात वाढ होणार आहे का ? अशी विचारणा करुन सौ. कोल्हे पुढे म्हणाले की, कोरोना या विषाणु मुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतक-यांची पण हीच परिस्थिती आहे. त्याच्या मालाला भाव नाही त्याचमालाचे हातात पैसे येतात त्यात त्याचा खर्च सुद्धा निघालेला नसतो अशी दयनीय अवस्था शेतक-यांची झालेली आहे. त्याचबरोबर वादळीवारा, गारपीट, अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसानीचे देखील मोठे संकट उभे राहिले आहे. वेगवेगळे संकट शेतकरी बांधवांवर येत असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हा निघुन गेला तरी पण शेतकरी आजही उन्हा तान्हात काम करत आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर महावितरण निर्मीत अपत्ती शेतक-यांवर ओढवल्यामुळे शेतकरी आजही संकटात आहे. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय कसा होईल अशा पध्दतीचे नियोजन होत असल्यामुळे जगाचा पोशींदा म्हणुन ओळखले जाणारे शेतक-याने जगायचे तरी कसे ?. पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका उन्हाळी आवर्तनाच्या तारखा त्वरीत जाहिर करा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची पाटबंधारे खात्याने गंभीरपणे दखल घ्यावी असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव , माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी दिला.

COMMENTS