पाऊस थांबला, विसर्ग घटला !

Homeताज्या बातम्याअहमदनगर

पाऊस थांबला, विसर्ग घटला !

। नगर । इगतपुरी तालुक्यातील किरकोळ पाऊस वगळता धरणांच्या पाणलोटात पाऊस गेल्या तीन दिवसांपासुन थांबला आहे. नवीन पाण्याची आवक थांबल्याने धरणातील विस

परमार्थात कान तर संसारात डोळे उघडे ठेवले पाहिजे ः हभप अरूण महाराज
माहेश्‍वरी समाजाकडून महेश नवमी उत्साहात साजरी      
 दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामास प्रारंभाने मोठे समाधान : आ.काळे




। नगर ।

इगतपुरी तालुक्यातील किरकोळ पाऊस वगळता धरणांच्या पाणलोटात पाऊस गेल्या तीन दिवसांपासुन थांबला आहे. नवीन पाण्याची आवक थांबल्याने धरणातील विसर्ग घटविण्यात आले आहेत. गंगापूरचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर मधून जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येणारा गोदावरीतील विसर्ग अवघा 1614 क्युसेकवर आला आहे. जायकवाडीचा जायकवाडीचा उपयुक्तसाठा 70 टक्क्यांवर पोहचला आहे. काल सायंकाळी 6 वाजता या धरणात 18103 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती.

दारणा, भावलीच्या पाणलोटात हालका पाऊस काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात नोंदला गेला. भावलीच्या भिंतीजवळ 20 मिमी, दारणा च्या भिंतीजवळ 2 मिमी, पाणलोटातील इगतपूरी येथे 18 मिमी, वाकीला 13 मिमी पाऊस नोंदला गेला. अन्यत्र पावसाने उघडीप दिली आहे. पाऊस थांबल्याने विसर्ग घटविण्यात आले आहेत. दारणाचा विसर्ग काल सकाळी 6 वाजता 2672 क्युसेक इतका होता.

काल सायंकाळी या धरणाचे सर्व वक्राकार गेट बंद करण्यात आले आहेत. या धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या गेटमधुन अवघा 1100 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 1 जून पासुन काल सकाळी 6 पर्यंत दारणातुन 7.3 टिएमसी इतका विसर्ग करण्यात आला आहे. दारणात भाममधुन 1440 क्युसेक तर भावलीतुन 290 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. दारणाच्या खाली गोदावरीकडे वाहणार्या प्रवाहात वालदेवीचा 599 क्युसेक, कडवाचा 636 क्युसेक, व आळंदीचा 30 क्युसेक विसर्ग दाखल होत आहे. गंगापूरचा विसर्ग बुधवारी रात्री 10 वाजता बंद करण्यात आला आहे. गंगापूरमधुन एकूण 1 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

जलद कालव्याला पाणी

वरील धरणातील विसर्ग कमी झाल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतील विसर्ग काल सकाळी 3155 क्युसेक इतका होता. काल सायंकाळी तो 1614 क्युसेकवर आणण्यात आला आहे. या बंधार्यातून गोदावरीत 13.1 टिएमसी इतका विसर्ग एकूण काल पर्यंत करण्यात आला आहे. गोदावरी चे दोन्ही कालवे पिण्याच्या पाण्यासाठीच्या आवर्तनासाठी सुरु आहेत. गोदावरी उजव्या कालव्याचे पाणी काल राहाता परिसरात सायंकाळी 6 च्या दरम्यान पोहचले. दरम्यान वैजापूर, गंगापूर तालुक्याच्या दिशेने जाणारा जलद कालवा (नांदूरमधमेश्वर कालावा) काल सकाळी 9 वाजता सोडण्यात आला आहे. 502 क्युसेक ने हा कालवा सोडण्यात आला आहे.

जायकवाडीत उपयुक्तसाठा 53.2 टिएमसी!

जायकवाडीत दोन दिवसांपुर्वी नविन पाण्याची मोठी आवक झाली. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात जायकवाडी जलाशयात 3.9 टिएमसी पाणी दाखल झाले. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडीतील साठा 53.22 टिएमसी उपयुक्त साठा झाला आहे. हा साठा 69.40 टक्के इतका आहे. काल सायंकाळी 6 वाजता या जलाशयात 18103 क्युसेकने पाणी दाखल होत होते. याहंगामात जायकवाडी जलाशयात नविन सुमारे 33 टिएमसी पाणी दाखल झाले.

COMMENTS