देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे अहमदनगर जिल्ह्यातील कारखानादार हे पांढऱ्या कपड्यातील सर्वात मोठे दरोडेखोर आहेत.हे तुमच्या ऊसावर दरोडे घालतात
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
अहमदनगर जिल्ह्यातील कारखानादार हे पांढऱ्या कपड्यातील सर्वात मोठे दरोडेखोर आहेत.हे तुमच्या ऊसावर दरोडे घालतात,आज ऊस उत्पादक शेतक-यांच्या बाजुने कोणीही बोलायला तयार नाही.केंद्र सरकार बरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार देखील शेतक-यांची लुटमार करत आल्याचे घनाघाती टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी.खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ येथे बोलत होते.मंगळवारी राञी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जागर एफआरपीचा आरधना शक्तीपिठाची या भव्य शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकार जहरी टिका केली असुन शेतक-यांना मोठे आंदोलन उभे करण्याचे आवाहन केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड.रावसाहेब करपे हे होते तर प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदिप जगताप,माजी ना.रविकांत तुपकर,अमोलसिंह कदम,प्रकाश बालवडकर,रनजित बागल,डाॅ.वैभव शेटे,ज्ञानदेव निमसे,जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे हे होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणतात, एफआरपीचे तुकडे करायचे विचाराधीन नाही. मग, रमेशचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची समिती कशासाठी नेमली. समितीने कारखानदारांच्या तीन बैठका व कृषी मूल्य आयोगाचा अभिप्राय कशासाठी घेतला, असा खडा सवाल विचारुन, छाताडावर बसून एकरकमी एफआरपी घेऊ.” असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
शेट्टी पुढे म्हणाले, “देशातील साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची 20 हजार कोटींची एफआरपी थकित आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात ऊस दर नियंत्रण कायद्यान्वये थकित एफआरपी व्याजासह मिळावी. यासाठी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकार व पंधरा राज्यांना तीन आठवड्यात खुलासा मागितला. त्यामुळे, केंद्र सरकारने घाईगडबडीत एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान रचले. त्याला, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने संमती देऊन, शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे.”
शेट्टी पुढे म्हणाले “ऊस गाळप झाल्यावर चौदा दिवसांत एफआरपी एकरकमी अदा करावी. अन्यथा, विलंब दिवसांच्या व्याजासह एफआरपी द्यावी. अशी कायद्यात तरतूद असतांना साखर कारखानदार एफआरपीचे तुकडे करून देतात. एफआरपी थकवतात. शेतकऱ्यांचे पैसे वापरतात. अशा परिस्थितीत केंद्र, राज्य सरकारने तीन तुकड्यांमध्ये एफआरपी देण्याची कायद्यात तरतूद केली. तर, शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी पाच वर्षे वाट पहावी लागेल.” अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली.
माजी.ना.रविकांत तुपकर म्हणाले की, “टाकळीमिया हे चळवळीला, उभारी देणारे गाव आहे. स्वाभिमानीचे चळवळीतील खंदे कार्यकर्ते रवींद्र मोरे यांच्या पाठीशी गाव उभे आहे. याचे समाधान आहे. नगर जिल्हा चळवळीत कायम अग्रभागी असतो. परंतु, शेतकऱ्यांच्या चळवळीत मागे पडला आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साखर उद्योगातील नेते मोठे वाटतात. त्यांनी लुटले तरी त्यांच्या मागे राहतात. त्यामुळे, नगर जिल्ह्यात सांगली, सातारा, कोल्हापूरच्या तुलनेत एक हजार रुपये ऊसदर कमी मिळतो. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस दराच्या प्रश्नावर लढले पाहिजे.”
यावेळी रवींद्र मोरे म्हणाले की, “स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेळोवेळी ऊस, दूध दरवाढीसाठी आंदोलने केली. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळतो. सत्तेची लालसा नसलेले त्यांचे नेतृत्व आहे. राज्यातील 288 आमदार व 44 खासदार यांच्यापैकी एकही एकरकमी एफआरपीसाठी बोलत नाही. नगर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकजूट नाही. त्यामुळे, एकेकाळी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत नगर जिल्ह्याचा ऊसदर 200 रुपये प्रतिटन वरून, 1200 रुपये प्रतिटन कमी झाला आहे. शेतकरी संघटीत नसल्याने, मागील दहा-बारा वर्षात एवढा मोठा फरक पडला आहे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश देठे,ज्ञानदेव निमसे,सरपंच गुलाब निमसे,केशव शिंदे,बाळासाहेब जाधव,अनिल इंगळे,आनंद वने,सतिष पवार,प्रमोद पवार,सचिन पवळे,विशाल तारडे,चेतन देठे, निलेश लांबे,आसिफ पटेल,सचिन गडगुळे,राहुल करपे,संदिप शिरसाठ, सुनिल इंगळे आदिंनी विशेष परीश्रम घेतले.सदर शेतकरी मेळ्याव्यास शेकडो शेतकरी उपस्थित होते.स्वाभिमानीचे नेते प्रकाश देठे यांनी प्रास्ताविक केले. स्वाभिमानी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शेट्टी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तालुकाध्यक्ष सतीश पवार यांनी आभार मानले.
COMMENTS