गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव होतो आहे.
कोपरगाव शहर प्रतिनिधी- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव होतो आहे. शासन या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न करत आहे. रुग्णालयातही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांची स्थिती गंभीर असून, त्यांना रक्ताची नितांत गरज भासत आहे. तसेच रुग्णालयातील वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे तसेच प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे, अहमदनगर जिल्ह्याचे उत्तरनगर प्रमुख अनिल राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक ०३ मे २०२१ रोजी कोपरगाव येथे कोविड योध्दा रक्तदान शिबीर आयोजित आले असून या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत जास्तीत जास्त रक्त साठा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे कारण येणाऱ्या काळात लसीकरण मोहीम जोरात सुरू होणार असून त्यामुळेच लस घेतल्या नंतर पुढील तीन महिने आपणांस इच्छा असून देखील रक्तदान करता येणार नाहीय त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढे येत सामाजिक बांधिलकी जोपासत देश हिताच्या कार्यास हातभार लावावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुकाअध्यक्ष मनीष जाधव यांनी केली आहे.
COMMENTS