पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू: जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू: जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे

अहमदनगर प्रतिनिधी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या असून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवि

व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचे नागरिक ठरता आहे बळी ः विवेक कोल्हे
टाकळी कडेवळीत डॉ. आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी
उन्हाळी आर्वतनाचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक

अहमदनगर प्रतिनिधी : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या असून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष पदाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. 

नगर शहरामध्ये महिलांचे संघटन केले जाईल. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्चाची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांनी भाजपाच्या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांचे प्रश्न सोडवावे. भाजपाची मिळाळाले पद हे समाजामध्ये मान-सन्मान मिळून देत असते. त्याच दृष्टिकोनातून आपले काम उभे करावे असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांनी केले.

        भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा अनुसूचित जाती महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र मैया गंधे, अनुसूचित जाती जमातीचे प्रदेशउपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे, अनुसूचित जाती जमातीचे शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, महिला शहर जिल्हाध्यक्ष कुसुमताई शेलार, ॲड अभिजीत आढागळे, संतोष पाटोळे, दीपक उमाप, साहेबराव काते, सोनू साबळे, अशोक भोसले, अजय देवकुळे, सुनील सकट, आदी उपस्थित होते.

        कुसुमताई शेलार म्हणाले की अनुसूचित जाती महिलांचे संघटन करून प्रश्न सोडवायचे काम केले जाईल. केंद्र सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करू. भाजपा अनुसूचित जाती जमाती ची कार्यकारणी जाहीर केली आहे. यापुढील काळात महिलांच्या माध्यमातून पक्षसंघटना वाढविणार असल्याचे ते म्हणाले

COMMENTS