पंढरपूरला सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवा : पंतप्रधान मोदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूरला सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवा : पंतप्रधान मोदी

पंढरपूर : पंढरपूरने भक्तीच्या शक्तीने मानवतेची ओळख करून दिली. लोक देवाकडे काही मागायला येत नाही. नुसत्या विठू माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्याचे प

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पादुका घेऊन बस मधून पंढरपूर कडे रवाना LokNews24
Pandharpur : पंढरपूर ग्रामीण भागातील २१ गावांत कडक लॉकडाऊन l Lok News24
पंढरपूरात आषाढीवारी दरम्यान संचारबंदी लागू..l LokNews24


पंढरपूर : पंढरपूरने भक्तीच्या शक्तीने मानवतेची ओळख करून दिली. लोक देवाकडे काही मागायला येत नाही. नुसत्या विठू माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटतात, असे सांगतानाच भक्ती आणि शक्तीचं प्रतिक असलेलं पंढरपूर भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, सोमवारी पंढपूरात पालखी मार्गाचे उद्धाटन झाले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात उपस्थिती लावली.
पंढरपूरला जोडणार्‍या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वारकर्‍यांच्या उपस्थितीत या पालखी मार्गाचं उद्धाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरूवात केली. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना देणारे ठरणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. पंढरपूरला जोडणार्‍या या महामार्गासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले.मी सर्व वारकर्‍यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले.

वारी म्हणजे समानतेची संधीच
पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन वारी आहे. जनतेचा मोठा सहभाग असलेली ही वारी आहे. भूतकाळात भारतावर अनेक आक्रमण झाली. आपला देश शेकडो वर्ष गुलामीत होता. नैसर्गिक आपत्ती आली, आव्हान आली, पण विठ्ठलावरील आपली आस्था तसूभरही ढळली नाही. वारीच्या माध्यमातून आपली दिंडी अनवरत सुरूच राहिली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वारकरी आंदोलनाचे एक वैशिष्ट्ये म्हणजे या आंदोलनात पुरुषांच्या पावलांवर पावलं ठेवून महिलाही सहभागी होतात. देशाची स्त्री शक्ती इथेच दिसते. पंढरीची वारी म्हणजे समानतेची संधीच आहे. म्हणूनच भेदाभेद अमंगळ हे या वारीच्या आंदोलनाचं ध्येय वाक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री ठाकरे
पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारकर्‍यांचे कौतुक केले. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS