न.पा. शाळेत जागतिक शिक्षक दिन साजरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न.पा. शाळेत जागतिक शिक्षक दिन साजरा

कोपरगाव / ता.प्रतिनिधीकोपरगाव नगरपालिका शाळा नं.६ येथे जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य न. पा. म न. पा. शिक्षक संघाच्या विद्यमाने नग

पंचायत समिती पदाधिकारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात
समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रोत्सव होणार उत्साहात
कोळपेवाडीत कालिकामाता मंदिराचा दरवाजा तोडून चोरी

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
कोपरगाव नगरपालिका शाळा नं.६ येथे जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य न. पा. म न. पा. शिक्षक संघाच्या विद्यमाने नगरपालिका गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

प्रशासनाधिकारी मोहनीश तुंबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास राज्य संघटक नवनाथ अकोलकर, जिल्हा अध्यक्ष फारुख शहा, चांगदेव ढेपले,सरचिटणीस विलास माळी , महिला आघाडी प्रमुख सविता साळुंके , जिल्हा सदस्य अरुण पगारे, मुख्याध्यापक, व सत्कामुर्ती शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल रहाणे यांनी केले.

या प्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त आरती कोरडकर, सविता राहीन्ज, नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त नसरीन इनामदार, नवनियुक्त जिल्हापदाधिकारी व गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आल प्रशासनाधिकारी यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरिता मार्गदर्शन करून शिक्षकांचे कौतुक केले.

श्री अकोलकर, श्री शहा व श्रीम साळुंके, श्री ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले सुनीता इंगळे यांनी सूत्रसंचलन केले मुख्याध्यापक भरत आगळे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता कल्पना निंबाळकर , निर्मला बनसोडे, स्मिता सोमोसे, माणिक कदम, प्रशांत शिंदे, ज्योती पवार, तेजस वारुळे, अमोल कडू, अर्जुन शिरसाठ, संतोष जाधव, सनी गायकर, गोपाळ कोळी यांनी नियोजन केले. विलास माळी यांनी आभार मानले.

COMMENTS