निर्दयी आईने बाळाला दिले उकिरड्यावर फेकून… महिलेच्या सतर्कतेने वाचला जीव (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्दयी आईने बाळाला दिले उकिरड्यावर फेकून… महिलेच्या सतर्कतेने वाचला जीव (Video)

ह्दय पिळवटून टाकणारी घटना भडगाव तालूक्यातील जुवार्डी बससँण्ड परिसरात घडली आहे. नविन प्लाँट वस्तीतील एका अडगळीत ठिकाणी अवघ्या एक दिवसाचे पुरुष जातीचे

आढळगाव ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचावरील अविश्‍वास ठराव नामंजूर
अतिरिक्त ऊसाचे पंचनामे करा ; शेतकरी शिष्टमंडळाची मागणी
ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात

ह्दय पिळवटून टाकणारी घटना भडगाव तालूक्यातील जुवार्डी बससँण्ड परिसरात घडली आहे. नविन प्लाँट वस्तीतील एका अडगळीत ठिकाणी अवघ्या एक दिवसाचे पुरुष जातीचे लहान बाळ आढळून आले. त्याला जन्म देणाऱ्या निर्दयी आईने नकोशा झालेल्या या बाळाला चक्क उकिरड्यावर टाकून दिले होते. नविन प्लाट वस्तीतील महीला सकाळी 7 वाजेच्या सुमारास उकिरड्यावर केरकचरा टाकण्यासाठी गेली असता तिला लहान बाळाचे पाय दिसून आले. महिलेने लगेचच ही खबर परिसरातील लोकांना दिली. ही बातमी वा-यासारखी पसरताच लोकांनी तिकडे धाव घेतली. याबाबत प्रसन्न लिलाधर पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला ही खबर दिली. या ठिकाणी बालरोगतज्ञ यांनी तपासणी करुन बाळ एक दिवसाचे असल्याचे सांगीतले. ते बाळ भडगाव पोलिसांनी महीला पोलिसांच्या माध्यमातून जळगांवला पाठवले आहे.

COMMENTS