Homeताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार व दैनंदिन व्यायाम गरजेचा – डॉ श्रीकांत पठारे

सध्याच्या धावपळीच्या युगात नागरिकांकडून स्वतःच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. नागरिकांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, सेंद्रिय पालेभाज

म्हाडाच्या इमारतीला आग, 135 नागरिकांची सुटका
लाइव्ह सेक्स शो रॅकेटचा पर्दाफाश
महाविकास आघाडीला भाजपचे प्रशासनातील दुवे शोधावे लागतील !

सध्याच्या धावपळीच्या युगात नागरिकांकडून स्वतःच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. नागरिकांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, सेंद्रिय पालेभाज्या व नियमित व्यायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.
अंगणवाडी बीट केंद्रामार्फत सकस आहार सप्ताह निमित्त आयोजित जवळे(ता-पारनेर) येथे कार्यक्रमात बोलताना पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी सांगितले की, दिवसेेंदिवस मानवाचे चुकीच्या आहारामुळे आयुष्यमान घटत असून त्याचे मानवाच्या शरीरावर ही दुष्परिणाम होत आहे. प्रत्येकाने आपला आहार घेताना सकस आहार घ्यावा. तसेच भाजीपाला सेंद्रिय खतापासून केलेल्या भाजीपाला खावा. तसेच प्रत्येकाला व्यायाम हा अत्यावश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्य आपला आहार व्यायाम याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याचे दुष्परिणाम होत आहेत. ते भविष्यातील पिढीवर होऊ नये म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना सकस आहार सेंद्रिय खाताचा वापर करून पिकेवलेला भाजीपाला खाणे व व्यायाम हे अत्यावश्यक आहे. पूर्वीच्या काळी घाण्याचे तेल हे कोणतेही केमिकलयुक्त नव्हते परंतु आजच्या काळातील केमिकलचा भेसळयुक्त तेलाने मनुष्याच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहेत. भविष्यातील पुढील पिढी सुदृढ निरोगी तयार होईल असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी यावेळी केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे जवळे सरपंच सौ अनिता ताई सुभाषराव आढाव, माजी सरपंच रत्नमाला शिंगाडे, पारनेर बाल विकास एकात्मक अधिकारी नारायण कराळे,पर्यवेक्षिका टाकळीढोकेश्वर गट सुजता लंके  पर्यवेक्षिका राळेगण सिद्धी ज्योती तवले कान्हूर  पठार गट कमल राऊत पवळे गट संगीता बोठे रोही गट अनिता बारवकर वडझिरे गट तेजस्विनी मैड
ग्रामपंचायत सदस्य मीना शिंगाडे, सोनाली सालके, मनीषा पठारे, तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच ग्रामस्थ गोरख सालके, मंगेश सालके, संतोष पठारे, नवनाथ पागिरे, बाळासाहेेब पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS