नियम डावलून सैलानी बाबाची यात्रा ; एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे; संदलची मिरवणूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नियम डावलून सैलानी बाबाची यात्रा ; एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे; संदलची मिरवणूक

जिल्ह्यातील सर्वांत मोठी आणि प्रसिद्ध असलेली सैलानी बाबाची यात्रा ही नारळाच्या होळीसाठी ओळखली जाते.

इस्लामपूर भाजपा युवा मोर्चाचे अभिजीत खडके यांचे अपघाती निधन
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
बिग बी- रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

बुलडाणा / प्रतिनिधी: जिल्ह्यातील सर्वांत मोठी आणि प्रसिद्ध असलेली सैलानी बाबाची यात्रा ही नारळाच्या होळीसाठी ओळखली जाते. दरवर्षी होळी आणि पाच दिवसांनी संदल यात्रा होत असते; परंतु या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये या वर्षीची यात्राही रद्द करण्यात आली होती; मात्र काल सैलानी बाबांच्या संदल यात्रेचा दिवस होता पोलिसांकडून अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

यात्रेला परवानगी नसतानाही मोठी गर्दी केल्याचा प्रकार घडला. यामुळे जवळपास हजार अनोळखी व्यक्तींविरोधात जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरवर्षी या यात्रेला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून जवळपास चार ते पाच लाख भाविक येत असतात; परंतु पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवून बाहेरून कोणत्याही यात्रेकरूंना सैलानी या ठिकाणी येऊ दिले नाही. त्यामुळे या वर्षी यात्रेमध्ये नागरिक नसल्यागत होते; परंतु काल रात्री संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक प्रतिकात्मक संदल काढण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे या ठिकाणचे व्यापारी आणि छोटे-मोठे व्यावसायिक संध्याकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान दर्ग्याजवळ आले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पोलिस तैनात होते आणि जवळपास हजार ते बाराशे लोक त्या ठिकाणी जमले होते. पंधरा मिनिटांमध्ये पोलिसांना निर्देश देऊन गर्दी हटवण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असतानाही स्थानिक मुजावर लोकांनी त्या ठिकाणी यात्रेचा प्रारंभ करून त्या ठिकाणी गर्दी जमवली. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन जवळपास एक हजार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

COMMENTS