निनाईनगर येथील व्यायाम शाळा पुन्हा पालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव

Homeमहाराष्ट्रसातारा

निनाईनगर येथील व्यायाम शाळा पुन्हा पालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव

बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केलेली नगरपालिकेच्या मालकीची निनाईनगर येथील व्यायाम शाळा पुन्हा पालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

भाजपचा कारभार हा महाराष्ट्रासाठी कलंक
बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या
नाफेड व एन सी सी एफ माध्यमातून चालू असलेली शेतकऱ्यांची फसवणूक त्वरित थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी- करण गायकर

इस्लामपूर / प्रतिनिधी : बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केलेली नगरपालिकेच्या मालकीची निनाईनगर येथील व्यायाम शाळा पुन्हा पालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला. विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी याबाबत हरकत दाखल केली होती. या बेकायदेशीर करारात सहभागी असलेले पदाधिकारी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत पालिकेची सभा झाली. वैभव पवार यांनी पालिकेच्या मालकीची 1 कोटी 90 लाख खर्च करून निनाईनगर येथे बांधण्यात आलेली व्यायाम शाळा बेकायदेशीरपणे जयंत पाटील क्रीडा मंडळास मासिक केवळ शंभर रुपये भाडे तत्त्वावर हस्तांतरित करण्यात आली आहे. ती पालिकेने ताब्यात घ्यावी, अशी हरकत दाखल केली होती. राष्ट्रवादीचे विश्‍वास डांगे यांनी या विषयावर मतदान घ्यावे, अशी सूचना मांडली. ती नगराध्यक्ष पाटील यांनी फेटाळली. संजय कोरे, शहाजी पाटील, विश्‍वास डांगे यांनी ही व्यायामशाळा उत्तमरित्या चालू आहे. त्यामुळे त्याच मंडळाकडे रहावी, अशी मागणी केली. आनंदराव पवार यांनीही मार्ग काढण्यात यावा, अशी सूचना मांडली. 

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, हा करार करताना कोणत्याही पध्दतीचे अधिमूल्य ठरविण्यात आलेले नाही. जाहिरात न देता व जाहीर लिलाव न काढता व्यायाम शाळा हस्तांतरित केली आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित  मंडळाकडून ही व्यायामशाळा पालिका ताब्यात घेईल. पवार यांच्या सूचनेनुसार या बेकायदेशीर करारात सहभागी असणार्‍या व मुख्याधिकारी कारवाई करतील. 

शहरातील शिवम कॉलनी व अन्य ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे सदस्यांनी पाणी पुरवठा अधिकार्‍यांना धारेवर धरले. आनंदराव पवार, शहाजी पाटील, शकील सय्यद, संजय कोरे, अमित ओसवाल, प्रतिभा शिंदे, विक्रम पाटील यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी, अशी मागणी केली. बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून महिला नगरसेविकांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, असा आरोप कोमल बनसोडे यांनी केला. पालिकेच्या सभागृहात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र लावावे,  शॉपिंग सेंटरला स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांचे नाव देण्यात यावे. यासाठी चंद्रशेखर तांदळे यांचे उपोषण सुरू आहे. यावर आज सभागृहात निर्णय घ्यावा, अशी मागणी आनंदराव पवार, अमित ओसवाल, चेतन शिंदे यांनी केली.               

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, कायदेशीर बाबी पडताळून पुढील सभेत हा विषय ठेवण्यात येईल. या प्रतिमेबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, स्व. वसंतदादा पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या ही प्रतिमा लावण्यात याव्यात, अशी मागणी आनंदराव पवार, वैभव पवार, कोमल बनसोडे यांनी केली.

COMMENTS