नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली होती.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर नाशिक पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. या दुर्घटनेबाबत त्यांनी म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची घडलेली दुर्घटना अतिशय वाईट होती. या दुर्घटनेला जबाबदार कोण याचा तपास होणे गरजेचे असून हे रुग्णालय भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
COMMENTS