अहमदनगर, दि. 4 (प्रतिनिधी)-देणार्याने देत जावे…घेणार्याने घेत जावे. घेता घेता घेणार्याने देणार्याचे हात घ्यावे…! ही म्हण ऐकायला खूपच छान वाटत
अहमदनगर, दि. 4 (प्रतिनिधी)-
देणार्याने देत जावे…घेणार्याने घेत जावे. घेता घेता घेणार्याने देणार्याचे हात घ्यावे…! ही म्हण ऐकायला खूपच छान वाटते. या म्हणीचा अर्थही खूप उदात्त आहे. मात्र, दुर्देवाने तसे घडत नाही. समाजातील गरजुंना मदत करण्यासाठी तुमच्याकडे खूप काही असावे लागत नाही. तुमच्याकडे केवळ दातृत्वाची वृत्ती असायला हवी, असे विचार माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी व्यक्त केले.
श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तपोवन रस्त्यावरील सेना भवनात आज धार्मिक कार्यक्रमानंतर नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र व कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होेते. उपमहापौर गणेश भोसले, बाळासाहेब शेजूळ, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सुनील वाघमारे, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष उन्मेश शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी, सलून-चालक मालक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जनार्धन वाघ, शहराध्यक्ष किशोर मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
अत्याधुनिक युगात आता नाभिक समाजातील तरुण व्यावसायिकांनीही आधुनिक साधनांचाच वापर करुन व्यवसाय करायला हवा. त्यासाठी आता नवनवीन अॅप्सही तयार झालेले आहेत. त्याचेही ज्ञान आत्मसात करावे. तसेच नोकरीवाला शोधण्यापेक्षा आता वधुपित्यांनी व मुलींनीही केवळ व्यावसाय करणार्या मुलांनाच लग्नासाठी पसंती द्यावी, असा मोलाचा सल्लाही सचिन जगताप यांनी यावेळी दिला.
नाभिक समाजट्रस्टतर्फे यावेळी करण्यात आलेल्या विविध मागण्यांवर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका तत्काळ निर्णय घेईल, असे आश्वासन उपमहापौर गणेश भोसले यांनी यावेळी दिले. निवासी संपादक विठ्ठल लांडगे, जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, बाळासाहेब शेजूळ यांनी मनोगत व्यक्त केले.
नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारीणीचे सदस्य विकास मदने यांनी प्रस्ताविक केले. संजय भुजबळ, प्रमोद शेजूळ, भाऊ मदने, विशाल मदने, सुनील खंडागळे, जगन्नाथ झेंडे, संतोष ताकपीर, जनार्धन शिंदे, सदाभाऊ शिंदे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
COMMENTS