नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले

संगमनेरी ( प्रतिनिधी )  प्रगत राष्ट्रासाठी व  समाजासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून जागतिकीकरणामध्ये आपले विद्यार्थी अधिक सक्षमतेने वावरण्य

युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला
Sangamner : दिवाळीच्या खरेदीसाठी संगमनेर शहरातील रस्त्यांवर गर्दीच गर्दी (Video)
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)

संगमनेरी ( प्रतिनिधी ) 

प्रगत राष्ट्रासाठी व  समाजासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून जागतिकीकरणामध्ये आपले विद्यार्थी अधिक सक्षमतेने वावरण्यासाठी प्राथमिक स्तरापासून शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर विद्यार्थ्यांना जीवनात मोठे यश मिळेल असा विश्वास ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी व्यक्त केला आहे.

 जयहिंद लोकचळवळीच्या वतीने दुसऱ्या ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्समध्ये शिक्षण ही बलशाली भारताची गुरुकिल्ली या विषयावर ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर या चर्चासत्रात ऑनलाईन पद्धतीने अमेरिकेहून डॉ. अनिल कुमार, इंग्लंड मधून हेरंब कुलकर्णी, लंडनमधून सिद्धार्थ मुकणे ,  डॉ. सुगन बरंठ, आफ्रिकेतून निविसा, यांनी सहभाग घेतला .यावेळी अमृतवाहिनीतील द्रोणागिरी च्या व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे , सौ.गितांजलीताई शेळके, उत्कर्षा रुपवते आदी उपस्थित होते तर ऑनलाइन पद्धतीने राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हेही सहभागी झाले होते

 ..यावेळी बोलताना रणजीतसिंह डिसले  गुरुजी म्हणाले की, शिक्षण हे समाज व्यवस्था बदलाचे प्रभावी माध्यम आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. जागतिक पातळीवर आपले विद्यार्थी पोहोचण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना बालवयापासूनच नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. 1993मध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली 2023 मध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये याची माहिती न होणे हे दुर्दैवी ठरू शकते. म्हणून शिक्षकांवर जबाबदारी आहे. त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत कृतिशीलतेतून शिक्षण द्यावे. पारंपारिक पद्धतीमध्ये बदल बदल करणे अनिवार्य ठरले आहे. शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसून मुलींमध्ये जास्तीत-जास्त आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले

तर आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की , सध्याच्या शिक्षण पद्धतीसाठी राज्यसरकार व भारत सरकारने जादा निधीची तरतूद केली पाहिजे .शिक्षण व्यवस्थाही विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी हवी आहे .मुलांना जे शिक्षण आवडते त्यांना त्यामध्ये संधी निर्माण करुन दिली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील शाळांपर्यंत पोहोचवले पाहिजे .विशेषता पूर्व प्राथमिक शिक्षणावर अधिक भर देणे गरजेचे आहे .याचबरोबर दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे. शिक्षणव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्था करावी असे सांगताना संशोधन पूरक शिक्षण प्रणाली अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

 यावेळी शिक्षण तज्ञ अमेरिकेहून डॉ. अनिल कुमार, हेरंब कुलकर्णी, निविसा, सिद्धार्थ मुकणे, डॉ सुगंध बरंठ यांनीही आपली मते व्यक्त केली..

 यावेळी डॉ. मनोज चौधरी, निखील पापडेजा गौरव डोंगरे, चांगदेव खेमनर, बंटी साळवे, समीर लामखेडे, गणेश गुंजाळ, नामदेव कहांडळ, तुषार गायकर, मिलिंद औटी खालील पठाण ,डॉ शिल्पा गुंजाळ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्कर्षा ताई रूपवते यांनी केले सूत्रसंचालन सौ गीतांजली शेळके व डॉ वैष्णवी केदार यांनी केले तर डॉ सुरज गवांदे यांनी आभार मानले

COMMENTS