नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच : भाऊ कोरगावकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच : भाऊ कोरगावकर

अहमदनगर/प्रतिनिधी-अहोरात्र प्रयत्न करून नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच, असा विश्‍वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी येथे व्यक्त केला. नग

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य : मुश्रीफ
दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
Ahmednagar : धक्कादायक …अहमदनगर जिल्ह्यात घडला मॉब लिंचींग चा प्रकार | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-अहोरात्र प्रयत्न करून नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच, असा विश्‍वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी येथे व्यक्त केला. नगर शहराला विकासाच्या मार्गावर पुढे आणण्याचे काम फक्त आणि फक्त शिवसेनाच करू शकते. माजी आमदार व उपनेते (स्व.) अनिल राठोड यांनी नगरच्या जनतेचे आणि शिवसेनेचे प्रेमाचे नाते निर्माण केले. स्वतःचा मनात कायम (स्व.)बाळासाहेब ठाकरेंचे विचार ठेवून जनतेला कायम रक्षण, न्याय, त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राठोड कायम अग्रेसर राहिले. म्हणून अहोरात्र प्रयत्न करून नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणार, असेही कोरगावकरांनी आवर्जून सांगितले.
शहर शिवसेनेच्यावतीने सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियानाची सांगता कोरगावकर यांच्या उपस्थितीत नक्षत्र लॉन येथे झाली. यावेळी कोरगावकर यांच्यासह जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अनिल बोरुडे, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, गणेश कवडे, शाम नळकांडे, अमोल येवले, विजय पठारे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, अशोक दहिफळे, संग्राम शेळके, संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रवीण मोकाटे, राजेंद्र भगत, दीपक कावळे, शाम सोनवणे, मृणाल भिंगारदिवे, सुमित धेंड, महेश शेळके, स्मिता आष्टेकर, निर्मला धुपधरे, सुरेश क्षीरसागर, रंगनाथ सांगळे, अरुण शिंदे, दिलीप कानडे, राम इंगले, नंदू पेंडभाजे, अर्जुन दातरंगे, अर्जुन पठारे, अर्जुन बोरुडे, डॉ.श्रीकांत चेमटे, रावसाहेब भाकरे उपस्थित होते.
नगरमध्ये शिवसेना रुजवण्याचे काम (स्व.)अनिल राठोड यांनी केले. नगरच्या जनतेचे शिवसेनेशी घट्ट नाते आहे. राठोड यांच्याकडे अडचणी, समस्या घेवून आलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाती गेला नाही, असे कोरगावकर यांनी आवर्जून सांगितले. सातपुते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या लाटेत (स्व.) अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रोज पाच हजार लोकांना भोजन मोफत देण्यात येत होते. शिवसेनेच्या माध्यमातून दोन्ही कोरोना लाटेमध्ये लोकांसाठी मोफत कोविड उपचार घेण्यासाठी यंत्रणा सज्ज केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावर बसल्यापासून महाराष्ट्राच्या जनतेला रेशनवरून मोफत धान्य, शिवभोजन थाळी, शेतकर्‍यांसाठी कर्ज माफी अशा अनेक जनहिताच्या योजना राबवल्या. या योजनेंचा प्रचार व प्रसार शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, असे आवाहन त्यांनी केले.

दोन वर्षात अफाट कामे
कोरगावकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरच्या विकास आराखड्यासहित महापौर व सर्व नगरसेवक-पदाधिकार्‍यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले आहे. मोठ्या प्रमाणात शहरात विकास कामे करण्यासाठी पुढील दोन वर्ष अफाट कामे शिवसेनेच्या माध्यमातून नगर शहरात केली जातील. जेणे करून नागरिकांना दिलासा मिळेल आणि यापुढे महापालिकेत शिवसेनेची एकहाती स्वबळावर सत्ता येईल, असा विश्‍वासही त्यांनी

COMMENTS