नगरमध्ये रंगणार राजकीय शिमगा… भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये रंगणार राजकीय शिमगा… भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना

चिचोंडी पाटील : प्रतिनिधी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूकीची मुदत  संपून दोन महिने झाले आहेत,  कोरोनामुळे निवडणुकीला&n

पंचनामे करून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ः आ. प्राजक्त तनपुरे
आ. तनपुरे यांच्या प्रयत्नातून 21 नवीन रोहित्रे बसविणार
शेतकरी हिताच्या योजनांना आडकाठी

चिचोंडी पाटील : प्रतिनिधी

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूकीची मुदत  संपून दोन महिने झाले आहेत,  कोरोनामुळे निवडणुकीला  ब्रेक लावले होते मात्र आता लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. पुढील महिन्यात निवडणूक जाहीर होणार असल्याने नगर महाविकास आघाडी व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी जोरदार तयारी सुरू केली.  या वेळेस महाविकास आघाडीकडून ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके प्रचारात उतरनार असल्याचे बोलले जाते तर बाजार समितीतील सत्ताधारी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या साथीला खासदार सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते प्रचाराची धुरा खांद्यावर घेणार आहेत.  थोपटणार आहेत. 

 यंदा निवडणुकीत जास्त रंगत येणार आहे. जिल्ह्याचे नेते प्रचारात येणार असल्याने राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे असेल. 

गेली १५ वर्षांपासून नगर बाजार समितीत माजी आमदार शिवाजीराव कर्डीले व भानुदास कोतकर यांची सत्ता आहे. कोतकर यांना एका खून प्रकरणी शिक्षा झाल्याने जवळपास १० वर्षांपासून कर्डीलेच  एकहाती कारभार बाजार समितीचा पाहतात.  कर्डीले सध्या भाजप मध्ये असल्याने नगरची बाजार समिती भाजपच्याच ताब्यात असल्याचेच वरिष्ठ नेत्यांमध्ये बोलले जाते. म्हणजे ही भाजपच्या ताब्यात असणारी बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात कशी येईल या दृष्टीने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रयत्न सुरू केल्याचे समजते. त्यांच्या आदेशानुसारच नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते व मंत्री या  निवडणुकीत ताकद लावणार आहेत. त्यामुळे या नेत्यांचा तालुक्यातील जनतेवर किती प्रभाव पडेल ?  हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

यापूर्वी बाजार समितीच्या  निवडणुकीत फक्त तालुक्यातील नेत्यांचाच  कलगी तुरा रंगायचा,  आता त्याला व्यापक स्वरूप येणार आहे. 

बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्याला  प्रत्युत्तर देताना बाजार समितीचे सभापती यांनी सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करतात तसेच मंत्री तनपुरेच यांना मदत करत असल्याचा आरोप केला होता. म्हणजे हे सगळं तनपुरेच घडवुन आणत असल्याचा सभापती घुगे यांचा सरळ रोक दिसत आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे.  तर नुकत्याच झालेल्या वाळुंज  बाह्यवळन रस्त्याच्या उद्घाटन वेळी नगर जिल्हा परिषद ताब्यात घेऊच आणि प्रत्येक निवडणुकीत मी कर्डीले यांच्या पाठीशीच खम्बीरपणे उभा राहणार असल्याचे बोलून खासदार सुजय विखे यांनी जाहीर सभेत बोलून दाखविले. तसेच त्यांनी मंत्री तनपुरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.  

मागील निवडणुकीत माजी खासदार व नगर बाजार समितीचे सस्थापक कै. दादा पाटील शेळके प्रचारात होते. परंतु तीन वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे. त्यांची राजकीय  पोकळी भरून निघणे अशक्य आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे ऐकाकी पडले आहेत.  त्यांच्या सोबतीला बाळासाहेब हराळ, प्रताप पाटील शेळके, संदेश कार्ले, गोविंद मोकटे ही सगळी मंडळी असली तरी एका मोठया नेत्याची महाविकास आघाडीला प्रचारात खूप गरज होती अन ती मंत्री तनपुरे आणि आमदार लंके यांच्या रूपाने भरून निघणार  आहे.  नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट तनपुरे यांच्या मतदारसंघात येतात,  विधानसभा निवडणुकीतही त्यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.भविष्यात हा मतदार पक्का करण्यासाठी तनपुरे यांनी बाजार समिती निवडणुकीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातही नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट आहेत.त्यांना सर्वात जास्त मतदान नगर तालुक्यातील जनतेनेच केले आहे. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने नगरची ही निवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीने आव्हानात्मक होणार आहे तर सध्याचे सत्ताधारी असणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

COMMENTS