नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…

फोनवरून मैत्री करून व फोटो काढून खंडणीची मागणी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखलअहमदनगर/प्रतिनिधी- तिघांनी संगनमत करून पाथर्डी येथील एका बागायतदार शेतकर्‍याश

कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे
प्रवरा नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

फोनवरून मैत्री करून व फोटो काढून खंडणीची मागणी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर/प्रतिनिधी- तिघांनी संगनमत करून पाथर्डी येथील एका बागायतदार शेतकर्‍याशी फोनवरून जवळीक साधून व मैत्री करून त्याला घरी बोलावले व त्याच्याबरोबर फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करून आणि मारहाण करुन पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतले तसेच दोन लाख रुपयांचे धनादेश घेऊन आणखी 2 लाखाची खंडणी घेतल्याचा प्रकार नगर शहराजवळील वडगाव गुप्ता शिवारात घडला.
याबाबतची अधिक माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील राघू हिवरे शिवारातील एका 42 वर्षीय बागायतदार शेतकर्‍याला एका महिलेने (राहणार वडगाव गुप्ता शिवार,नगर) फोन करून, जवळीक साधून मैत्री संपादन केली. त्यानंतर वारंवार फोन करून विश्‍वास संपादन केला व त्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत फोटो काढले व त्या फोटोद्वारे त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 15 जून रोजी ही शेतकरी व्यक्ती त्या महिलेच्या घरी गेली असताना त्या महिलेचा पती किरण खर्डे याने त्या दोघांना एकत्र पकडल्याचे भासवून शिवीगाळ व दांडक्याने मारहाण केली तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व त्यांच्याकडील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर त्या शेतकर्‍याच्या ओळखीचे गणेश गिर्‍हे यांना मध्यस्थीसाठी बोलावून त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचे तीन चेक लिहून घेतले व दोन लाख रुपये रोख रक्कम खंडणी म्हणून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी त्या महिलेसह किरण खर्डे, गणेश गिर्‍हे यांच्याविरुद्ध भादवि कलम 394, 384, 120 ब 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे हे करीत आहेत.

नवी टोळी उघड
पाथर्डीच्या शेतकर्‍याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने नगर तालुक्यात हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे. पाथर्डीच्या ज्या व्यक्तीला मध्यस्थ म्हणून या प्रकरणात बोलावले होते, तोही याच टोळीचा सदस्य असल्याचे समजते. या प्रकारामुळे नगर तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यात आणखीही अशा काही टोळ्या असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी अशा हनी ट्रॅपमध्ये फसलेल्यांना तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने कोणीही पुढे येत नसल्याचे समजते.

जिल्ह्यात चौथा गुन्हा
हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागण्याबाबतचा चौथा गुन्हा आता जिल्ह्यात घडला आहे. याआधी नगर तालुक्यातील जखणगाव येथील महिला व तिच्या साथीदारांनी एका शेतकर्‍यास व एका क्लासवन अधिकार्‍यास असे जाळ्यात ओढून त्याच्याकडे खंडणी मागितल्याने त्याबाबत दोन गुन्हे नगर तालुका पोलिसात दाखल आहेत. याशिवाय अकोले पोलिस ठाण्यातही अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. आता एमआयडीसी पोलिसात चौथा गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS