सक्कर चौक ते जीपीओ चौकदरम्यान 3 किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम आणि कोठी चौकातील पिण्याच्या पाईपलाईन स्थलांतराच्या कामामुळे स्टेशन रोडवरील वाहतूक 8 ते 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. येत्या रविवारपासून (20 जून) हा बदल करण्यात आला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी-सक्कर चौक ते जीपीओ चौकदरम्यान 3 किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम आणि कोठी चौकातील पिण्याच्या पाईपलाईन स्थलांतराच्या कामामुळे स्टेशन रोडवरील वाहतूक 8 ते 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. येत्या रविवारपासून (20 जून) हा बदल करण्यात आला आहे.
दोन टप्प्यात करण्यात येणार्या या कामात पहिल्या टप्प्यात दोन दिवस व दुसर्या टप्प्यात 7 दिवस हा रस्ता बाहेरगावच्या अवजड वाहनांसह स्थानिकांच्याही वाहनांसाठी बंद राहणार आहे. या काळात पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली गेली आहे. पुण्याकडे जाणारांना कोठी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे तर पुण्याकडून येणारांना नवीन टिळक रोड-दिल्लीगेट मार्गे जावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या वाहतूक बदलाला कोणाचा विरोध असेल वा काही सूचना असतील तर अशा हरकती-सूचना नोंदवण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
पुणे-नगर-औरंगाबाद महामार्गावरील नगरच्या स्टेशन रोड परिसरात सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान केंद्र सरकारच्या सुमारे पावणे चारशे कोटी रुपये निधीतून 3 किलोमीटरच्या उड्डाण पुलाचे काम मागील सुमारे वर्षभरापासून सुरू आहे. या पुलाचे बहुतांश पिलर (खांब) रोवले गेले आहेत. काही खांबांचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध हे काम सुरू असून, दोन्ही बाजूने जाण्या-येण्यासाठी छोटे रस्ते आहेत. पण त्यांची दुरवस्था झाल्याने या रस्त्यांवर छोटे-मोठे अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर या पुलाचे काम वाहतूक अडथळ्याविना मार्गी लागावे तसेच कोठीजवळील पिण्याच्या पाईपलाईनचे स्थलांतर वेगाने करता येण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद करून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
असा होणार वाहतूक मार्गात बदल
सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम एकीकडे प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने अहमदनगर महापालिकेकडून कोठी चौक या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईनचे स्थलांतराचे काम करावयाचे प्रस्तावित आहे. हे काम दोन टप्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याने त्या कालावधीत या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात (दिनांक 20 जून ते 21 जून 2021 या कालावधीत) अहमदनगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कोठी चौक येथून-मार्केटयार्ड महात्मा फुले भाजी मार्केट-महात्मा फुले चौक-आनंदधाम-आनंदऋषीजी रुग्णालय-सक्कर चौक मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच दुसर्या टप्यासाठी पुण्याकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूकदि. 22 जून ते 28 जून 2021 या कालावधीत सक्कर चौक येथून नवीन टिळकरोड-आयुवेंदिक कॉलेज कॉर्नर- अमरधाम रस्ता-नेप्ती नाका-दिल्ली गेट-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपी ऑफिस चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
एसटी व अवजड वाहनांना सूचना
22 जून ते 28 जून 2021 या कालावधीत हातमपुरा ते कोठी चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकार्यांच्या अधिसूचनेनुसार अहमदनगर शहरातील बाजारपेठेत माल खाली करणार्या अवजड वाहनांना चांदणी चौक ते सक्कर चौक दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सर्व वाहने (एस.टी.बसेस) एसपी ऑफिस चौक-पत्रकार चौक-दिल्ली गेट-नेप्तीनाका-अमरधाम रस्ता-नवीन टिळकरोड-सक्कर चौक या मार्गाचा वापर करतील. एसटी बसेस यांना मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौक दरम्यान या काळात प्रवेश बंदी असणार आहे.
हरकती नोंदवण्याचे आवाहन
स्टेशन रस्त्यावरील पुलाच्या वा पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याबाबत कोणाच्या काही हरकती वा सूचना असल्यास त्या नोंदविण्याचे
आवाहन पोलिस विभागाने केले आहे. याबाबत संबंधितांनी पोलिसांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेत समक्ष येवून किंवा ई-मेलद्वारे ( ळि.ींषललळीूं.रपीऽारहरिेश्रळलश.र्सेीं.ळप) दि. 17 जून 2021 रोजीपर्यंत देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
COMMENTS