Homeमहाराष्ट्रअहमदनगर

धर्मासाठी दिलेले बलिदान व्यर्थ नसते : प्रा. नवाळे

बेलापूर : देश व धर्मासाठी दिलेले बलिदान कधीच व्यर्थ ठरत नाही. धैर्य, निष्ठा, बलिदान व प्रेरणा या स्व:विश्वासाने हाताळाव्या लागतात असे विचार विद्यार्थ

कोरोनामुळे शहर बँकेच्या वसुलीवर परिणाम ; यंदा 1 कोटीचा नफा, ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : पुणे विभाग-एक दृष्टीक्षेप
संजीवनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य सुविधायुक्त सेंटर – देवेंद्र फडणवीस

बेलापूर : देश व धर्मासाठी दिलेले बलिदान कधीच व्यर्थ ठरत नाही. धैर्य, निष्ठा, बलिदान व प्रेरणा या स्व:विश्वासाने हाताळाव्या लागतात असे विचार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय नवाळे यांनी व्यक्त केले. येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आयोजित वीर बाल दिवस निमित्ताने ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रकाश देशपांडे हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. अशोक माने प्रा.अशोक थोरात प्रा.चंद्रकांत कोतकर प्रा. विलास गायकवाड प्रा. डॉ.विनायक काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.डॉ. संजय नवाळे पुढे म्हणाले की शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंग यांचे दोन लहान पुत्र साहिबजादा जोरावर सिंग व साहिबजादा फतेहसिंग यांनी अल्पवयातच धर्मासाठी आपले बलिदान दिले. धर्म वाचविण्यासाठीची त्यांची निष्ठा आजच्या मानवतेला विचार करावयास लावते म्हणून त्यांचे बलिदान कधीच व्यर्थ ठरणार नाही असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. गुंफा कोकाटे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापिका अमृता गायकवाड यांनी केले.

COMMENTS