धक्कादायक… स्मशानभूमीत शेड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागला ताडपत्रीचा आधार…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक… स्मशानभूमीत शेड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागला ताडपत्रीचा आधार…

सरण ही थकले मरण पाहुणी..? असाच काहीसा प्रकार सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीत पिळूकपाडा येथे घडला आहे. स्मशानभूमी नसल्याने भरपावसात सरणा

सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची घोषणा
उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली
ओबीसी शिष्टमंडळाची 29 सप्टेंबरला राज्य सरकारसोबत बैठक

सरण ही थकले मरण पाहुणी..? असाच काहीसा प्रकार सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीत पिळूकपाडा येथे घडला आहे. स्मशानभूमी नसल्याने भरपावसात सरणावर ताडपत्री टाकून अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली. एका मृतदेहाची अवहेलना झाल्याने उपस्थित असलेले सर्वच हळहळले. येथील एका  वाहन चालकाचे आक्समिक निधन झाले. सकाळ पासूनच संततधार पाऊस सुरु होता. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नीडाग द्यायचा कसा अशा प्रश्न नागरिकांना पडला. त्यासाठी थेट पाऊस उघडण्याची वाट पाहावी लागली. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. अशी अवस्था आदिवासी तालूक्यातील आहे.

Vo- एकीकडे शासनस्तरावर आदिवासी भागातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जात असल्याचा कांगावा केला जात आहे. तर दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. मात्र, अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. सातपैकी एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तरी आदिवासी बांधवाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS