वेब टीम : दिल्ली गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. जगभरातील कोरोना रुग्णसंख्या 22 कोटी 48 हजार 243 वर पोहोच
वेब टीम : दिल्ली
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. जगभरातील कोरोना रुग्णसंख्या 22 कोटी 48 हजार 243 वर पोहोचली आहे.
त्यापैकी, 19 कोटी 67 लाख 14 हजार 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, 45 लाख 58 हजार 572 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे.
जगभरात सध्या 1 कोटी 87 लाख 76 हजार 533 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, 1 लाख 5 हजार 693 रुग्ण गंभीर आहेत.
जगात सर्वाधिक 4 कोटी 5 लाख 13 हजार 18 रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत.
सर्वाधिक 6 लाख 62 हजार 853 मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत. रुग्णसंख्येत भारत दुसर्या स्थानावर आहे. त्यानंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो.
COMMENTS