दोन शाही स्नानांनंतर कुंभ प्रतीकात्मक पद्धतीने असावा : पंतप्रधान

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

दोन शाही स्नानांनंतर कुंभ प्रतीकात्मक पद्धतीने असावा : पंतप्रधान

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित कुंभ मेळ्यात तसेच देशातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदींनी शनिवारी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि त्यांच्याकडे संतांच्या आरोग्याबाबत चौकशी केली.

धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू
दहशतवादावरील दुटप्पी भूमिकेला थारा नाही : पंतप्रधान मोदी
राजकीय पेचात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित कुंभ मेळ्यात तसेच देशातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदींनी शनिवारी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि त्यांच्याकडे संतांच्या आरोग्याबाबत चौकशी केली. या पर्वादरम्यान प्रशासनाला पूर्ण सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी संत समाजाचे आभार मानले. 

मेळ्यातील दोन शाही स्नाने आधीच पार पडली असल्याने आता यानंतरचे कुंभ प्रतीकात्मक पद्धतीने साजरे करण्याची विनंती पंतप्रधानांनी या संभाषणात केली. यामुळे कोरोना संकटा विरुद्धचा लढा बळकट होईल असे पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले. यावेळी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनीदेखील पंतप्रधानांच्या या विनंतीचा मान राखत भक्तांनी कुंभ स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये तसेच सर्व कोरोनायोग्य वर्तणूक अनुसरावी आणि सर्व नियम नीट पाळावे असे आवाहन केले.

COMMENTS