दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना

अभिजित खंडागळे/ पाथर्डी : तालुक्यातील खेर्डे येथे दोन वर्षोपुर्वी लग्नात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाचा मनात राग धरून राजेंद्र रामकिसन जेधे यांच

Ram Kadam | 12 आमदारांचे निलंबन ही संविधानाची पायमल्ली |LOKNews24
शनिशिंगणापुरात शनि लीलामृत पाच दिवसीय ग्रंथ पारायण
jalgaon : कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल श्रीमद यांचा सत्कार l LokNews24

अभिजित खंडागळे/ पाथर्डी : तालुक्यातील खेर्डे येथे दोन वर्षोपुर्वी लग्नात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाचा मनात राग धरून राजेंद्र रामकिसन जेधे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली;दरम्यान याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रशांत बबन शेळके,किशोर बाबासाहेब शेळके,प्रवीण बबन शेळके,बबन जगन्नाथ शेळके (सर्व रा.खेर्डे) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत.

या घटनेबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,प्रशांत बबन शेळके व राजेंद्र रामकीसन जेधे यांच्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी गावातील लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीचा राग मनात धरून शेळके व त्यांच्या साथीदाराने आपसात संगमताने राजेंद्र जेधे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन मयताच्या   घराच्या पडवीच्या बाहेर प्रशांत बबन शेळके यांच्या साथीदाराने जेधे यांना पकडून ठेवून शिवीगाळ केली व प्रशांत बबन शेळके याने त्यांच्या हातातील धारदार चाकू जेधे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस मारून गंभीर जखमी केले.त्यानंतर जेधे यांना नातेवाईकानी उपजिल्हारुग्णालय पाथर्डी येथे नेऊन उपचार करत पुढील उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे आहे.

घटना घडल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण,सहायक पोलिस निरीक्षक वाघ,सहायक पोलिस निरीक्षक कायदे,गोपनीय विभागाचे भगवान सानप आदीं जणांनी भेट दिली.

COMMENTS