दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात.

Homeताज्या बातम्यादेश

दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात.

आठ प्रवासी जागीच ठार .

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - बिहार(Bihar) हून दिल्ली(Delhi) च्या दिशेने जाणाऱ्या दोन डबल डेकर खासगी बस एकमेकांना धडकल्या. एका भरधाव बसने मागून दुसऱ्या ब

आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
लातूरमध्ये विचित्र अपघातानंतर 7 गाड्या जळून खाक

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – बिहार(Bihar) हून दिल्ली(Delhi) च्या दिशेने जाणाऱ्या दोन डबल डेकर खासगी बस एकमेकांना धडकल्या. एका भरधाव बसने मागून दुसऱ्या बसला धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातामध्ये आतापर्यंत आठ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर डझनभर लोकं गंभीररीत्या जखमी झालेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी(Police) तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली. तसंच जखमींनाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे.

COMMENTS