दोघा तडीपार भावांना अटक

Homeनाशिक

दोघा तडीपार भावांना अटक

नाशिक/प्रतिनिधी : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरात फिरणाऱ्या दोघा भावांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर यापूर्वी विविध गुन्ह्यांची

येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…
लहान व्यवसायांमध्ये वाढीच्या शक्यतांसह गुंतवणूक 
महिला सक्षमीकरणाच्या योजनांतून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक/प्रतिनिधी : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरात फिरणाऱ्या दोघा भावांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन शाकीर शेख (वय २४), समीर शाकीर शेख (२३) अशी दोघा तडीपारांची नावे आहेत. वडाळा रोड परिसरातील भारतनगर मधील मस्जिद गल्लीत त्यांचा रहिवास असून दोघांनाही पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशाने एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. पूर्व परवानगी न घेता ते दोघेही भारतनगर मध्ये फिरत असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हवालदार सोनार पुढील तपास करत आहेत.

COMMENTS