देशमुख निकवर्तीयांच्या नावावर चालवत होते 27 कंपन्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख निकवर्तीयांच्या नावावर चालवत होते 27 कंपन्या

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत असून, यादरम्यान त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात बुधवारी एका नवी

Dakhal : खाजगी रुग्णालयांचा जनतेला लुटण्याचा धंदा | LokNews24
सरकारवर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे – संजय राऊत 
काश्मीरमध्ये महिलेसह दोन दहशतवाद्यांना अटक

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत असून, यादरम्यान त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात बुधवारी एका नवीन खुलासा झाला असून, देशमुख आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर 27 कंपन्या चालवत असल्याचे समोर आले.
ईडीला अशा 13 कंपन्यांविषयी माहिती मिळाली आहे, ज्या अनिल देशमुख, त्यांचे मुलं सलिल आणि ऋषिकेशच्या थेट कंट्रोलमध्ये होत्या. यासोबतच 14 अशा कंपन्या आहेत, ज्या अनिल देशमुखांच्या निककटवर्तीयांच्या कंट्रोलमध्ये सुरू होत्या. ईडीच्या सूत्रांनुसार, यामधून काही शेल कंपन्यांचा देखील समावेश आहे. ईडीच्या तपासात या कंपन्यांमध्ये वारंवार व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. खरेतर ईडीने त्यांची अटक अँटिलिया केसमध्ये अटकेत असलेले बरखास्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंद्वारे वसुली केलेल्या 4.7 कोटी रुपयांच्या प्रकरणात केली आहे. हे पैसे सचिन वाझेंनी मुंबईचे अनेक रेस्तरॉ आणि बार ओनर्सकडून घेतले आणि देशमुखांचे स्वीय सचिव (पीएस) संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक (पीए) कुंदन शिंदेंना दिले होते. दोघांना ईडीने अटक केली आहे. तपासात समोर आले आहे की, या पैशांना एका शेल कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले आणि नंतर नागपुरातील एका चॅरिटेबल ट्रस्ट श्री साई शिक्षण संस्थेच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले.
अनिल देशमुख यांच्या बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशाचा वापर करण्यासाठी या संस्थांचा वापर करण्यात आल्याचा दावा ईडीच्या अधिकार्‍यांनी न्यायालयात केला आहे. नंतर या संस्था आणि व्यक्तींच्या विविध बँक खात्यांची तपासणी करण्यात आली आणि हे कळाले की, देशमुखांच्या कुटुंबातील सदस्यांद्वारे अप्रत्यक्षपणे नियंत्रित कंपन्यांकडून पैशांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. याची बॅलेन्स शीट आणि बँक अकाउंट स्टेटमेंट तपासल्यानंतर संकेत मिळतो की, यामधून काही संस्थांचा कोणताही वास्तविक व्यवसाय नाही आणि याचा उपयोग केवळ फंडच्या रोटेशनसाठी करण्यात येत आहे. ईडीने या संबंधीत अनेक दस्तावेजही न्यायालयात पुरावे म्हणून सादर केले आहेत.

COMMENTS