आईस्क्रीम, ताक आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच त्यापासून बनणार्या शीतपेयांसाठी उन्हाळा चांगला असतो; परंतु कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसर्या वर्षीही दुग्धोत्पादन व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई/प्रतिनिधीः आईस्क्रीम, ताक आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच त्यापासून बनणार्या शीतपेयांसाठी उन्हाळा चांगला असतो; परंतु कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसर्या वर्षीही दुग्धोत्पादन व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन उद्योग चिंतेत आहे.
गेल्या वर्षाची सुरुवात टाळेबंदीने झाली होती. त्यामुळे दूध, पनीर, आईस्क्रीम, श्रीखंड अशा पदार्थांना मागणीच नव्हती. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने उठाव कमी झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून हा उद्योग सावरत असताना आता पुन्हा वीकएंड टाळेबंदी लागली आहे. महाराष्ट्रात तर कठोर निर्बंध आहे. शेजारच्या मध्य प्रदेश, कर्नाटकातही तसेच निर्बंध लागणे आता सुरू झाले आहे. गेल्या वर्षीच्य टाळेबंदीच्या फटक्यातून अजून हॉटेल व्य्वसाय सावरू शकलेला नाही. त्यातच पुन्हा टाळेबंदी सुरू झाली आहे. लग्न तसेच अन्य धार्मिक समारंभ बंद आहेत. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाली आहे. त्यातच टाळेबंदीच्या भीतीमुळे महाराष्ट्रातील लाखो स्थलांतरित कामगारांनी परत जायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दुधाची मागणीही कमी झाली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. अनेक भाक अति संक्रमित झाले आहेत. गेल्या वर्षी जशी अशा भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी य्ंत्रण होती, तशी ती या वेळी केलेली नाही. त्यामुळे घरातील दुधाचा दैनंदिन वापर थांबला आहे. या उन्हाळ्यात दुग्ध उत्पादनांची मागणी सरासरीपेक्षा कमी असू शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ही आघाडीची दलाली संस्था, उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणी कशी असेल, याचा अभ्यास करते. अभ्यासानुसार कोरोनाच्या नव्या लाटेला आळा घालण्यासाठी राज्यांमध्ये नवीन निर्बंध आणि टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या उन्हाळ्यात अल्प कालावधीसाठी या डेअरी उत्पादनांची मागणी सरासरीपेक्षा कमी असू शकते. सभा, समारंभ, लग्न आदी कार्यक्रम कमी केल्यामुळे आईस्क्रीमचा वापर कमी होईल. लस्सी, ताक आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी होऊ शकतो. शुक्रवारी जाहीर झालेल्या डेअरी सेक्टरच्या अहवालात त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला. या उन्हाळ्यात प्रोटीन पावडर, दही, प्रीमियम चीज यासारख्या नवीन डेअरी उत्पादनांचा वापर कमी होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बहुतेक डेअरी उत्पादनांची मागणी अतिशय मंदावलेली होती. गेल्या आर्थिक वर्षात डेअरी उत्पादनांची मागणी पार्टी-फंक्शनसाठी कमी होती; परंतु घरगुती वापर जास्त होता. देशामध्ये दुधाव्यतिरिक्त बटर, तूप, चीज यासारख्या दुग्धजन पदार्थांना मोठी मागणी असते. ही मागणी देशातील सहकारी दूध संघ, सहकारी संस्था आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या पूर्ण करतात.
टेट्रापॅकची मागणी वाढेल
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांच्या मते, गेल्या वर्षी संघटित दुग्ध कंपन्यांचा बाजारातील वाटा लक्षणीय वाढला आहे. हा ट्रेंड या वर्षीही सुरू राहू शकेल. कोविडच्या भीतीने लोकांनी घरात जास्त वेळ घालवला तर टेट्रा पॅक केलेले दूध आणि दुग्धशाळेतील व्हाईटनरचा वापर वाढेल, अशी माहिती विश्लेषकांनी दिली.
COMMENTS