दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध

संगमनेर/प्रतिनिधीसंगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात असलेल्या यंग नॅशनल मैदान याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने दुषित जल शुद्धीकरण संयंत्र (एसटिपी प्ल

Z.P निवडणुकांची तारीख झालीय जाहीर, मात्र लक्ष लागलंय सरकार आणि विरोधी पक्षाकडे
अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर l LokNews24

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात असलेल्या यंग नॅशनल मैदान याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने दुषित जल शुद्धीकरण संयंत्र (एसटिपी प्लांट) उभारण्यात येत आहे. मात्र या प्लांटला परिसरातील स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून याबाबत नगरपालिकेला निवेदनही देण्यात आले आहे.

आज मंगळवार दि. ७ रोजी सकाळी नऊ वाजता नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी काम चालू करण्यासाठी आले असता त्या वेळी स्थानिक नागरिक एकत्र येत या कामाला विरोध केला. यावेळी स्थानिक नागरिक व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ वादही झाले.

संगमनेर नगरपिषदेकडून याठिकाणी उभारणी होत असलेल्या दुषित जल शुद्धीकरण संयंत्र (एसटिपी प्लांट) मुळे येथील नागरिकांना भविष्यात त्याचा त्रास होणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जोर्वे नाका भागातील यंग नॅशनल मैदानाची जागा हि स्थानिक रहिवाशांसाठी उपयोगात यावी असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी नगरपरिषदेने सुसज्ज बाग व खेळाचे मैदान उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नगरपरिषदेने संबंधित दुषित जल शुद्धीकरण संयंत्र दुसर्या जागेवर न्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा पवित्र घेण्यात येणारे असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी स्थानिक रहिवाशी व प्रशासकिय अधिकार्यांत वाद मिटविण्यासाठी येथील नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्ती केली. त्यानंतर अखेर नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणाहून निघून गेले.

COMMENTS