Homeताज्या बातम्या

दारू वाहतुकीवर राजूर पोलिसांची कारवाई

साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकास अटक; दोघे फरार अकोले : राजूर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या विनानंबर डस्टर गाडीव

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ
एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्या
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकास अटक; दोघे फरार

अकोले : राजूर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या विनानंबर डस्टर गाडीवर धडक कारवाई करत सुमारे ५ लाख ४२ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघे आरोपी फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने खाजगी वाहनाने राजूर गावातील खडकी रोडवर सापळा रचला. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची विनानंबर डस्टर गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. संशय आल्याने सदर गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीत देशी दारूचे ११ बॉक्स आढळून आले.

गाडी व चालकास राजूर पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता, चालकाने आपले नाव सनिल भाऊसाहेब तोरमल (वय २८, रा. अंबड, ता. अकोले) असे सांगितले. सदर वाहन हे वैभव नवले (रा. इंदोरी, ता. अकोले) याचे असून, त्याच्या सांगण्यावरून संगमनेर येथील बबलू शेठ याच्या दुकानातून दारू भरून खडकी येथे नेण्यासाठी वाहतूक करत असल्याची कबुली आरोपीने दिली.

या प्रकरणी राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ सनिल तोरमल यास अटक करण्यात आली असून, आरोपी क्रमांक २ वैभव नवले व आरोपी क्रमांक ३ बबलू शेठ (रा. संगमनेर) हे फरार आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे (संगमनेर विभाग) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे, पो.हे.कॉ. रविंद्र वलवे, पो.कॉ. सचिन शिंदे, विजय काळे, उषा मुठे, परते, मुठे आदींचा सहभाग होता. पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत.

COMMENTS