अहमदाबाद : दहशतीच्या बाळावर सत्ता बळकावता येते. परंतु, अशी सत्ता फार काळ टिकवणे कठीण असते. सोमनाथ मंदिर याचे जीवंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन पंतप
अहमदाबाद : दहशतीच्या बाळावर सत्ता बळकावता येते. परंतु, अशी सत्ता फार काळ टिकवणे कठीण असते. सोमनाथ मंदिर याचे जीवंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरातील पार्वती माता मंदिराच्या पायाभरणी समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.
सोमनाथ मंदिर समारंभागत दिल्लीतून आपण ऑनलाइन उपस्थित आहोत. पण मनाने तिथेच आहे. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आपल्या दृढ निर्धारातून केला होता. मी त्यांना नमन करतो, असं पीएम मोदी म्हणाले. या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे ही ऑनलाइन उपस्थित होते. तर मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गुजरातचे पर्यटन मंत्री जवाहर चावडा हे सोमनाथ मंदिरात उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, दहशतवादाने श्रद्धेला चिरडता येऊ शकत नाही. सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सोमनाथ मंदिर अनेकदा तोडले गेले, अनेकदा मूर्तींची तोडफोड केली गेली आणि याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सोमनाथ मंदिर भारतासह संपूर्ण जगासाठी विश्वास आणि एक आश्वासन देखील आहे. ज्या विध्वंसक शक्ती आहेत, जे दहशतीच्या आधारावर शक्ती प्रदर्शित करतात. ते काही काळासाठी वर्चस्व राखू शकतात. पण त्यांचे अस्तित्व कधीही कायम स्वरुपी नसते. ते अधिक काळ मानवतेला दडपू शकत नाही. काहींनी सोमनाथ मंदिर पाडण्याच्या प्रयत्न केला. यामुळे हे सत्य अजूनही लागू पडतं. सोमनाथ मंदिराच्या भव्य विकास आणि बांधकामाचा प्रवास काही वर्षांचा नाही, तर प्रबळ इच्छाशक्ती आणि शतकानुशतकांच्या वैचारिक भावनेची साक्ष आहे. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि कन्हैयालाल मुंशी यांच्या संकल्पाचे हे फळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.जेव्हा आधुनिकतेला पर्यटनाची जोड दिली जाते, तेव्हा बदल कसे होतात, हे गुजरातमध्ये दिसून आले आहे. कच्छ ते द्वारकापर्यंत सोमनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे आजूबाजूच्या भागातही बदल झाले. देश आणि जगभरातून भाविक आणि पर्यटक इथं येतात. इथं येणाऱ्या भाविकांना जुन्या सोमनाथ मंदिराच्या दर्शनाचाही लाभ घेता येईल. पार्वती मातेच्या मंदिराचे बांधकाम ही अभूतपूर्व घटना आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असलेली आपली मंदिरे पर्यटन आणि श्रद्धेची मोठी केंद्रे आहेत, ज्यामुळे आसपासचा परिसरही विकसित होतोय, असे पंतप्रधानांनी सांगितले.
एकूण 66 खांबांवर उभारणार मंदिर
सोमनाथ येथील माता पार्वती मंदिरासंदर्भात विश्वस्त जे.डी. परमार यांनी सांगितले की, हे मंदिर पांढऱ्या दगडाचे असेल आणि त्याची उंची 71 फूट असेल. मंदिर 66 खांबांवर बांधले जाईल आणि त्याचे क्षेत्रफळ 18891 फूट असेल. ज्यात गर्भगृह सभा मंडप, माताजींची सभा असे विभाग असतील. सोमनाथ मंदिराप्रमाणे या मंदिराच्या दक्षिण भागातून समुद्राचे दर्शन होईल. शिव मंदिराजवळ शिवपंचायतीची परंपरा आहे, हे लक्षात घेऊन इथे पार्वती मंदिर बांधण्याचा संकल्प करण्यात आला. शिवपंचायतीमध्ये गणपती, गंगाजी, हनुमान जी यांच्या मूर्तीचा समावेश असेल.
COMMENTS