दलित महिलांना विष्ठा साफ करायला लावली;  पाेलिस निरीक्षक केंद्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलित महिलांना विष्ठा साफ करायला लावली; पाेलिस निरीक्षक केंद्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मातंग समाजातील महिलांना आपल्या घरातून बोलावून जबरदस्तीने मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली.

 एक्सप्रेस वे ‘ वर बार्निग कारचा थरार
भारत अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार (Video)
९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह | LOKNews24

सोलापूर : टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मातंग समाजातील महिलांना आपल्या घरातून बोलावून जबरदस्तीने मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली. पोलिस स्टेशनचे कंपाउंड झाडून काढायला लावले. ७५ वर्षीय वृध्द कोरोनामुक्त महिलेसही दमबाजी करीत शिवीगाळ केली. कोरोनामुळे पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित न येण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना त्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी राजकुमार केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक काशीद, पोलिस कॉ. ठोंबरे, पोलिस कॉ. गुटाळ आदी पोलिस कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करून निलंबित करण्याची मागणी, येथील दलित संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.


 टेंभुर्णी शहरातील पोलिस ठाणे लगतच्या अण्णा भाऊ साठे नगरात मातंग समाजाची रहिवासी वस्ती आहे. त्यामुळे वाऱ्याने कचरा उडून पोलिस ठाणे आवारात जात होता. पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी वीस ते पंचवीस पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महिलांना व लहान मुलांना राहत्या घरी जाऊन धक्काबुक्की करत घरातून ओढत बाहेर काढून आणले. पोलिस स्टेशन आवारातील घाण तुम्हीच टाकलेली आहे, ती तुम्हीच उचला असे म्हणत जवळपास ५० महिला व लहान मुले यांना शिवीगाळ करून त्यांना संपूर्ण कचरा, घाण, गटार, संडास, माणसांची व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली. महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पोलिस कर्मचाऱ्यांसोबत काठीने, पट्ट्याने मारहाण केली. पोलिस स्टेशन परिसरातील कचरा उचलायला भाग पाडले. पोलिसांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दलित संघटनांनी पोलिस अधीक्षक, करमाळा विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांना पाठवले आहे.

COMMENTS