Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकलेल्या फीसाठी वकिलाने अशिलाचेच केले अपहरण

आपल्या वकिलाच्या सेवेची फी न भरणे मुंबईत एका व्यावसायिकाला चांगलेच महाग पडले आहे.

हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
सलूनमध्ये हेअर वॉश करताना महिलेचा मृत्यू
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ | LokNews24

मुंबई/प्रतिनिधी: आपल्या वकिलाच्या सेवेची फी न भरणे मुंबईत एका व्यावसायिकाला चांगलेच महाग पडले आहे. या वकिलाने थेट आपल्या व्यावसायिक अशिलाचे अपहरण करून फार्महाऊसवर त्याचा छळ केला. अशिलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका 45 वर्षीय वकिलाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. 

ज्याचे अपहरण झाले, तो  अशील एका शिपिंग कंपनीचा मालक आहे. अशिलाने न्यायालयातील युक्तीवादाच्या फीचे तीन कोटी रुपये थकवले होते. फसवणुकीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळवून देण्याचे हे प्रकरण होते. वकील विमल झा यांनी दोन एप्रिलला नवनाथ गोळे यांचे अपहरण केले, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विमल बिडवी यांनी सांगितले. गोळे यांनी पैसे द्यायला नकार दिला, तेव्हा झा यांनी संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी गोळेवर दबाव आणला व नाशिकच्या फार्महाऊसवर त्यांचा छळ केला, असे पोलिसांनी सांगितले. खारघर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विमल झा यांना अटक केली आहे. 

COMMENTS