’तोक्ते’ चक्रीवादळाचे दहा बळी ; घरे कोसळली ; बागा उन्मळल्या ; वीज खंडीत ; वाहतूक ठप्प

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’तोक्ते’ चक्रीवादळाचे दहा बळी ; घरे कोसळली ; बागा उन्मळल्या ; वीज खंडीत ; वाहतूक ठप्प

अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले असले, तरी या वादळाने देशात दहाहून अधिक बळी घेतले आहेत.

गाडीचा ब्रिकफेल झाल्याने संरक्षण भिंत तोडून बस शिरली इमारतीत 
अखेर तरगावफाट्याला न्याय; रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटींचा निधी मंजूर
अमिताभ बच्चन यांची नात आराध्याने दिल्ली हायकोर्टात याचिका केली दाखल

मुंबई / प्रतिनिधीः अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले असले, तरी या वादळाने देशात दहाहून अधिक बळी घेतले आहेत. त्यात कर्नाटकात चार तर महाराष्ट्रात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. ऐंशी ते शंभर किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वाहनाने बागा उन्मळून पडल्या. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. 

हजारो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर आदळले. चक्रीवादळाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्र रुप धारण केले होते. वार्‍यात अनेक घरांवरील छप्परे उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या भागातील वीज खंडीत झाली. रायगडमध्ये अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातील 1600 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचा वृक्ष कोसळून दोघी सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी सव्वातीन वाजता घडली. ज्योती बल्लू बारेला (वय 16) आणि रोशनी बल्लू बारेला (वय 10) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. मुंबई आणि गुजरातच्या दिशेने येणार्‍या तौत्क चक्रीवादळाने अचानक दिशा बदलली आणि ते गोव्याच्या समुद्र किनार्‍याला धडकले आहे. या वादळाचा तडखा गोव्यात दिसून येत आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळामुळे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. वादळामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तौत्के चक्रीवादळाचा तडाखा कर्नाटकलाही बसला आहे. वादळामुळे कर्नाटात मुसळधार पाऊस पडतो आहे. गेल्या 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे. खासकरून किनारपट्टी भागात पाऊस पडत आहे. पावसाने 73 गावांना झोडपून काढले आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेले. शिवाय, आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरील पत्रेदेखील उडून गेले आहेत. जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला असून नेटवर्कला देखील समस्या येत आहेत. देवरूखमधील एका घरावर झाड कोसळले असून सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जिल्ह्यात साधारण दोन हजारच्या आसपास नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. समुद्रातदेखील उंच लाटा उसळत आहेत. रेडी ते विजयदुर्ग या 120 किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडे पडल्यामुळे बंद आहेत, तर घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात 100 ते 110 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळ घोंगावत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मालवण तालुक्यात ठिकठिकाणी झाडे चक्रीवादळामुळे पडली. खांबही रस्त्यावर पडल्यामुळे रस्ते बंद झाले. वीज पुरवठा खंडित झाला आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे छत कोसळून नुकसान झाले, तर आंबोली घाटात दरड व झाड कोसळून घाटमार्ग काही काळ ठप्प झाला. आंबा, काजू, बागायतदारांचे कलम झाडे, फणस पडलेले आहेत. चक्रीवादळाच्या तडाखा तालुक्यातील अनेक काजू बागायदारांचे नुकसान झाले आहे.

रुग्णालयांच्या वीजपुरवठ्यावर लक्ष

अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनार्‍यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली. आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासकांकडून तयारीचा आढावा घेण्यात आला.

कोरानाबाधितांना हलविले सुरक्षित स्थळी

चक्रीवादळात नुकसान होऊ नये, म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रेही पावसापासून संरक्षण करणारी असली, तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

COMMENTS