तुम्ही सावरा ; आम्ही सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही सावरा ; आम्ही सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगड, रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाखांची मदतरायगड/प्रतिनिधी - मागील पाच दिवसांपासून राज्यात पावासाने हाहा:क

साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो
मुख्यमंत्री उद्धवजी, बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडांवर कारवाई कधी करणार ? lLokNews24
पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटीचे पॅकेज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगड, रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाखांची मदत
रायगड/प्रतिनिधी – मागील पाच दिवसांपासून राज्यात पावासाने हाहा:कार माजवला आहे. पूरग्रस्त स्थिती, दरड कोसळल्यामुळे आणि इतर दुर्घटनामुळे राज्यात 100 पेक्षा जास्त जणांना जीव गमावाला लागला. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू; सर्वांना मदत दिली जाईल. या दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे. त्या सर्वांचे पुनर्वसन केले जाईल, त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही स्वतःला सावरा बाकीची काळजी आम्ही घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकग्रस्त नागरिकांना दिली.
गेल्या काही वर्षांत पावसाळा चक्रीवादळानेच सुरु होतो. त्यामुळे हा अनुभव पाहता ज्या ज्या ठिकाणी अशा वस्त्या आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्यसंदर्भात लवकरच आराखडा तयार करु. जेणेकरुन ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करु. सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण परिसरात झालेला संहार पाहता पाण्याचं नियोजन करायला हवं. त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. सरकार त्यावर काम करत असल्याचे देखील ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तळीये गावात अद्याप बचावकार्य सुरूच आहे. 40 पेक्षा अधिक माणसांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. अनेक जण मलब्याखाली गाढले गेलेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. गाई-जनावारांसह पिकांचेही नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरीसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटानग्रस्त जिल्ह्यांना मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळोई येथील दुर्घटनाभागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्यात मागील पाच दिवसांत पावासाने हाहा:कार माजवला असून अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. कोकण-प. महाराष्ट्र पावसामुळे जायबंदी झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं सांगितले आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.


पूरग्रस्त कुटुंबांना मोफत अन्नधान्य
राज्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे पूरग्रस्त निराधार कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. या पूरग्रस्त कुटुंबाना राज्य सरकार 10 किलो गहू, तांदूळ, 5 लिटर रॉकेल मोफत देणार आहे. यावर बोलतांना उपमुख्मंत्री अजित पवार म्हणाले की, पूरग्रस्तांना अन्नधान्य व पिण्याचे पाणी पोहोचवण्यास सरकारचे प्राधान्य आहे. वीज नसल्यामुळे व गिरण्या बंद असल्यामुळे लोकांना गहू देऊन उपयोग होणार नाही. त्यांना तांदूळ, डाळ व रॉकेल दिले जाईल. जेणेकरून लोक खिचडी करून खाऊ शकतील. शिवभोजन केंद्रांची संख्याही वाढवली जाईल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

COMMENTS