तुम्ही अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, आम्ही बनवलं तर खंजीर खुपसला का?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, आम्ही बनवलं तर खंजीर खुपसला का?

प्रतिनिधी : मुंबईतुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवले ते राजकारण! दुसरे कोणी केले असते तर पाठीत खंजीर खुपसला! राजकारणात देशभरात अशा गोष्

विकासापेक्षा धर्माच्या नावावर होणारे राजकारण दुर्देवी – नामदार थोरात
धुळवडीला माहेरी गेलेल्या पत्नीच्या कृत्यामुळे पतीची आत्महत्या | LOKNews24
एसटीच्या प्रवाशांना मिळणार साडेपाच महिन्यांनी दिलासा

प्रतिनिधी : मुंबई
तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवले ते राजकारण! दुसरे कोणी केले असते तर पाठीत खंजीर खुपसला! राजकारणात देशभरात अशा गोष्टी सुरू असतात.

मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडले ते राजकारण. दुसरे कोणी केले असते तर खंजीर खुपसला. हे शब्द आता राजकारणात कोणी वापरू नयेत, वापरले जाऊ नयेत. राजकारण गेल्या काही वर्षांपासून याच पद्धतीने सुरू आहे.

अनेक वर्षांपासून जंग खात पडलेला ‘राजकारणात खंजीर खुसपणे’ हा शब्द गेल्या काही दिवसांत धारदार होऊन अनेकांना जखमी करतो आहे. एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी टीका केली होती.

आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पाटलांना टोमणा मारला- ‘अजित पवारांना घेऊन त्यांनी सरकार बनवलं ते राजकारण. इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?’

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की ‘राजकारणात कोणी साधुसंत असते का? तुमचे आज राज्यात सरकार नसेल. पण आमचे तीन पक्षांचे सरकार आहे ना, तरीही तुम्हाला तुमचे सरकार यावेसे वाटते! हे राजकारण आहे.

COMMENTS