Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिसरी लाटही जास्त प्राणघातक

स्टेट बँकेने दिलेल्या अहवालात तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेप्रमाणे प्राणघातक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. तिसर्‍या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
मोदींच्या फेट्याचा वाद ! आक्षेपानंतर फेट्यावरील राजमुद्रा काढण्यात आली | LOKNews24
दारू वाहतूक करणारी वाहने लुटणारी टोळी पकडली

नवी दिल्ली : स्टेट बँकेने दिलेल्या अहवालात तिसरी लाट ही दुसर्‍या लाटेप्रमाणे प्राणघातक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. तिसर्‍या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अनुभवांचा संदर्भ देताना स्टेट बँकेच्या अहवालात म्हटले आहे, की चांगल्या तयारीमुळे महामारीच्या आजारामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी 108 दिवस आणि तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहू शकते. स्टेट बँकेचा अहवाल अशा वेळी आला आहे, की देश तिसर्‍या लाटेच्या तयारीत व्यस्त आहे. कोरोना लसीकरणाची गती वाढविण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वैद्यकीय उपकरणेही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. दुसर्‍या लाटेचा परिणाम पाहता केवळ एका महिन्यात 90.3 लाख कोरोना प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत; मात्र गेल्या काही दिवसांपासून बहुतेक सर्व बाधित राज्यांमधील कोरोना परिस्थिती सुधारली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. एकीकडे आता दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, तिसर्‍या लाटेचा अधिक परिणाम लहान मुलांवर जाणवू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांचे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी दुपटीपेक्षाही अधिक तयारी करण्यात आल्याचे सांगत सरकारने आश्‍वासन दिले आहे. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लक्षणे नसलेल्या केसेस आहेत, तर दुसरीकडे गंभीर केसेस कमी आहेत. कोरोना विषाणूने आपले रूप बदलले तर लहान मुलांसाठी धोका वाढू शकतो, असे मत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी व्यक्त केले. लहान मुलांच्या रक्षणासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या केल्याच जातील. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. त्यामुळे 2 ते 3 टक्के मुलांनाच रुग्णालयाची गरज भासते.

COMMENTS