तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे

नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ. काळेंच्या तहसीलदारांना सूचना
माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ
नगरमधील व्यापारी एकजूट आता फुटीच्या उंबरठ्यावर ?

अहमदनगर/प्रतिनिधी- नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आ. जगताप यांनी नगर जिल्ह्यात तालुकास्तरावर ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू करण्याची तसेच कोविड प्रतिबंधक लस पुरवठा पुरेसा उपलब्ध होण्याची गरज मांडली. तसेच या दोन्ही बाबींसाठी शासनाला सूचित करण्याची विनंतीही पवारांकडे केली. 

    मागील बुधवारी मुंबई येथे आमदार संग्राम जगताप यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नगर शहरातील कोरोनाच्या प्रदूभार्वाच्या अनुषंगाने आरोग्य सुविधा व त्यांची उपलब्धता याची माहिती दिली. तसेच अहमदनगर जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाल्याने उपचारासाठी जिल्ह्यातून रुग्ण नगर शहरात येत असल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याने अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा तसेच व्हेंटिलेटरची कमतरता इत्यादी बाबी प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी पवारांना सांगितले. तज्ज्ञांच्या मते जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे व या काळात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनामार्फत अद्ययावत सर्व सोयीसुविधा युक्त ऑक्सिजन कोविड सेंटर तालुका स्तरावर उभारण्याबाबत आपण शासनास सूचित करावे, अशी मागणीही त्यांच्याकडे केली. तसेच शासनाकडून जास्तीतजास्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्याचीही गरज मांडली. त्यावर संबंधितांना आवश्यक सूचना देण्याची ग्वाही पवारांनी आ. जगताप यांना दिली.

सावेडीसाठी भुयार गटार योजना

पवारांची भेट घेतल्यानंतर आ. जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, युवती महिला प्रदेशअध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांच्याशीही कोविड महामारीवर चर्चा केली. यावेळी त्यांनी खा. सुळे यांच्याकडे अमृत योजनेअंतर्गत सावेडी भुयार गटार योजना मंजूर करण्याबाबत केंद्र स्तरावर मदत करण्याची मागणी केली तसेच उच्चतंत्र शिक्षणमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करताना, अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली.

COMMENTS