तालिबान्यांनी घेतले अफगाणिस्तान ताब्यात ; राष्ट्रपती अशरफ घनी परागंदा

Homeताज्या बातम्यादेश

तालिबान्यांनी घेतले अफगाणिस्तान ताब्यात ; राष्ट्रपती अशरफ घनी परागंदा

काबूल/वृत्तसंस्था : अफगाणिस्तानात तालिबानी सैन्यांनी 24 तासांत अनेक भागावर आपला ताबा मिळवला आहे. तालिबान्यांना अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्यासाठी किमान

आपल्या भाषेचे आपणच जतन करावे : मुख्याधिकारी स्मिता काळे 
नांदेडनंतर संभाजीनगरमध्ये मृत्यूचे तांडव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ

काबूल/वृत्तसंस्था : अफगाणिस्तानात तालिबानी सैन्यांनी 24 तासांत अनेक भागावर आपला ताबा मिळवला आहे. तालिबान्यांना अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्यासाठी किमान एक महिना लागेल असे बोलले जात होते. मात्र तालिबान्यांची दहशत आणि अफगाण सैन्यांनी कुठलाही प्रतिकार न केल्यामुळे 24 तासांत तालिबान्यांनी काबूलचा पाडाव करत अनेक प्रांत आपल्या ताब्यात घेतले आहे.
अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांना देश सोडून परागंंदा व्हावे लागले आहे. तर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भयावह चित्र आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झाले आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. काबूल काबीज केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. दरम्यान, तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास चीन तयार असल्याचे म्हटले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो. दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या विमानतळावर जमलेल्या हजारो लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तालिबानपासून वाचण्यासाठी हजारो लोक देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्न करत आहेत. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार देखील करावा लागला. कट्टरपंथी इस्लामिक गट तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, असे म्हटले जात आहे. मुल्ला बरादरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण खूप कमी वेळेत प्रस्थापित झाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.

COMMENTS