वेब टीम : काबूलतालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे पंजशीरच्या बंडखोरांकडून अजूनही संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात आ
वेब टीम : काबूल
तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे पंजशीरच्या बंडखोरांकडून अजूनही संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
आता बंडखोर नेते मसूद अहमद यांनी एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध केला असून पंजशीरमध्ये अजूनही विद्रोही सैन्य असून तालिबानविरोधात संघर्ष संपला नसल्याचे म्हटले आहे.
मसूद यांनी अफगाणिस्तानच्या सर्व नागरिकांना तालिबानविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. पंजशीरचे विद्रोही सैन्य तालिबानविरोधात लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्रोही सैन्य पंजशीरमध्ये असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करणार असून पराभव मान्य करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानने थेट पंजशीरमध्ये अफगाण नागरिकांवर हल्ला केला. ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय पाहत आहे. सध्या आमची लढाई तालिबानसोबत नसून पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयसोबत सुरू आहे. तालिबानचे नेतृत्व पाकिस्तान करत असल्याचा दावा मसूद अहमद यांनी केला.
अफगाणिस्तानमधील पंजशीर खोर्यात पुन्हा एकदा तालिबान आणि अहमद मसूद यांच्या नेतृत्वातील रेझिस्टन्स फोर्समध्ये भीषण संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
पंजशीरच्या डोंगर-दर्यांमध्ये असलेल्या बंडखोरांनी सोमवारी रात्री तालिबानच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान तालिबानच्या ठिकाणांवर अज्ञात विमानांनीही हवाई हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा हवाई हल्ला अफगाण हवाई दलाच्या वैमानिकाने केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हल्ल्याच्या दाव्याला कोणीही दुजोरा दिला नाही. दरम्यान, स्थानिकांनी पंजशीरमध्ये तीन लढाऊ विमाने दिसल्याचे म्हटले.
COMMENTS