नागपूर : इस्लामच्या नावावर बदनामीचा डाग असलेल्या तालीबानींचे समर्थन करणाऱ्यांची नुसती निंदा करून चालणार नाही. तर त्यांना स्पष्टपणे नाकारा असे आवाहन म
नागपूर : इस्लामच्या नावावर बदनामीचा डाग असलेल्या तालीबानींचे समर्थन करणाऱ्यांची नुसती निंदा करून चालणार नाही. तर त्यांना स्पष्टपणे नाकारा असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या देशभरातील सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. संपूर्ण भारतात तालीबान्यांविरोधात निदर्शने करून त्यांचा निषेध करण्याचे आवाहनही मंचाने केले आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी, शायर मुनव्वर राणा, समाजवादी पार्टीचे खासदार शाफिकुर्रह्मन बर्क, एआयएम्आयएमचे असदुद्दीन ओवैसी आदिंनी तालिबानला योग्य ठरवले आहे. तालीबान्यांची तुलना भारताच्या स्वातंत्र्य सेनानिंशी केली आहे. असे लोक इस्लामचे पुरस्कर्ते असूच शकत नाही. भारतीय मुस्लिमांनी अशा लोकांना केवळ निंदा करून सोडू नये तर त्यांना नाकारावे असे आवाहन मंचाने केले आहे. संपूर्ण जगात आज मुस्लिम समाज भारता इतका कुठेही सुरक्षीत नाही. कारण भारताचा इस्लाम शांती, सद्भाव आणि बंधूभाव कायम ठेवणारा आहे. आज याच इस्लामला स्थापित करण्याची गरज असल्याचे मंचाने म्हटले आहे. तालीबानी लहान मुले, स्रीया या सर्वांवर अत्याचार करीत आहे. हे शरीयतच्या विरूद्ध आहे. मोहम्मद अफज़ल (राष्ट्रीय संयोजक, दिल्ली), डॉ. शाहिद अख्तर (राष्ट्रीय संयोजक, दिल्ली), अबू बकर नकवी (राष्ट्रीय संयोजक, टोंक, राजस्थान), एस के मुद्दीन (राष्ट्रीय संयोजक, जबलपुर, म.प्र.), इस्लाम अब्बास (राष्ट्रीय संयोजक, आग्रा), रज़ा रिज़वी (राष्ट्रीय संयोजक, लखनौ), इरफ़ान अली (राष्ट्रीय संयोजक, मुंबई), डॉ. माजिद अली तलिकोटी (राष्ट्रीय संयोजक, कर्नाटक), एड. शिराज कुरैशी (राष्ट्रीय संयोजक, भारत फर्स्ट, ग्वालियर), बिलाल उर रहमान (राष्ट्रीय संयोजक, हिंदुस्तान फर्स्ट-हिन्दुस्तानी बेस्ट दिल्ली), डॉ. ताहिर हुसेन (संयोजक, दूतावास संपर्क, दिल्ली), डॉ. इमरान चौधरी (दिल्ली), खुर्शीद राजाका (हरयाणा), डॉ. महताब आलम रिज़वी (दिल्ली), रेशमा हुसेन (राष्ट्रीय संयोजक, महिला प्रकोष्ठ प्रभारी, जयपुर), एड. शाहीन परवेज़ (राष्ट्रीय संयोजक, महिला प्रकोष्ठ, मेरठ), शहनाज़ अफज़ल (दिल्ली), शालिनी अली (दिल्ली), सुषमा पाचपोर (नागपुर), फातिमा अली (चेन्नई), सीमा खान (हैदराबाद) आदींनी तालीबान्यांचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
COMMENTS